Coronavirus: घरी परतणाऱ्या मजुरांच्या प्रवासाचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 09:28 AM2020-05-04T09:28:12+5:302020-05-04T09:31:09+5:30

कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मजूर आणि कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचे जाहीर केले. 

Coronavirus: congress bear expenses of rail journey of migrant workers says sonia gandhi vrd | Coronavirus: घरी परतणाऱ्या मजुरांच्या प्रवासाचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणा

Coronavirus: घरी परतणाऱ्या मजुरांच्या प्रवासाचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात नेण्यासाठी रेल्वे भाडं आकारणार आहे. तोच मुद्दा आता सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील संघर्षाचे नवे कारण बनला आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मजूर आणि कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचे जाहीर केले. 

नवी दिल्लीः कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात नेण्यासाठी रेल्वे भाडं आकारणार आहे. तोच मुद्दा आता सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील संघर्षाचे नवे कारण बनला आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मजूर आणि कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचे जाहीर केले. 

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. शुक्रवारी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सरकारने विशेष गाड्या सोडण्यास सुरुवात केली. रेल्वे परिपत्रकानुसार स्थानिक सरकारी अधिकारी सर्व पडताळणी करून मजुरांना तिकिटे देतील आणि त्यांच्याकडून तिकीट भाडे आकारले जाईल. मजूर आणि कामगारांकडून आकारण्यात येणारी तिकिटाच्या स्वरूपातील एकूण रक्कम ते अधिकारी रेल्वेला देणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोदी सरकारवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं असून, त्यांनी ते ट्विट केले आहे. 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने निर्णय घेतला आहे की, राज्य कॉंग्रेस कमिटीच्या प्रत्येक विभागानं गरजू मजूर व कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा प्रवास खर्च उचलावा. त्यांच्या तिकिटांचा खर्च करण्यासंदर्भात आवश्यक ती पावले उचलावीत. खरं तर राज्यांवर मजुरांच्या तिकिटाचा खर्च टाकून आणि त्यांच्याकडून भाडे वसूल केल्यानं विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळेच या स्थलांतरित कामगारांच्या प्रवासाचा खर्च केंद्राने उचलावा, अशी मागणी भाजपा विनाशासित राज्यांची आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IFSC: खायचे महाराष्ट्राचे व गोडवे गायचे महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांचे; शिवसेनेकडून फडणवीसांचा समाचार

Coronavirus: कोरोना लसीच्या आम्ही एकदम जवळ; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली 'वेळ'

होय, ते परत येताहेत; पण तिरंग्यात लपेटून; शहीद कर्नल शर्मा यांच्या पत्नीची आर्त भावना

... तर लॉकडाऊनचे नियम मोडून आम्ही रस्त्यावर उतर, खासदार जलील यांचा इशारा

एन्काऊंटरवेळी कर्नलच्या फोनवर दहशतवाद्यांनी म्हटलं अस्सलाम वालेकुम; अन्...

Web Title: Coronavirus: congress bear expenses of rail journey of migrant workers says sonia gandhi vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.