शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : जान है तो जहान है... पंतप्रधान मोदींचं हात जोडून देशवासियांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 20:26 IST

जनता कर्फ्युदिनी नागरिकांनी सायंकाळीी ५ वाजता दाखवलेल्या अतिउत्साहाबद्दल मोदींनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली होती. तसेच, लोकांनी अद्यापही कोरोनाला गंभीरतेनं घेतलं नसल्याचं सांगत

मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी लोकांना रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तसेच, कोरोना लॉक डाऊनकाळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांच्या सन्मानार्थ रविवारी सायंकाळी 5 वाजता आपआपल्या घरातून टाळ्या वाजवण्याचे आवाहनही मोदींनी जनतेला केले होते. त्यानुसार नागरिकांना प्रतिसादही दिला, सध्या सोशल मीडियावर पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि डॉक्टर्संचे कौतुक आहे. त्यानंतर, मोदींनी आज पुन्हा देशवासियांना संबोधित केले आहे. पुढील २१ दिवस देशात लॉक डाऊन राहणार असल्याचे सांगत देशावासियांसाठी हा निर्णय घेतल्याचे मोदींनी सांगितले. तसेच, जान है तो जहान है... असे म्हणत नागरिकांनी घरीच राहण्याचे आवाहन मोदींनी जनतेला हात जोडून केले

जनता कर्फ्युदिनी नागरिकांनी सायंकाळीी ५ वाजता दाखवलेल्या अतिउत्साहाबद्दल मोदींनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली होती. तसेच, लोकांनी अद्यापही कोरोनाला गंभीरतेनं घेतलं नसल्याचं सांगत मोदींनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर, आज पुन्हा एकदा मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधला आहे. त्यात, पुढील २१ दिवसांसाठी देशात लॉक डाऊन करण्यात येत असल्याचे मोदींनी जाहीर केले. आज रात्री १२ वाजल्यापासून हा लॉक डाऊन करण्यात येत असल्याचे मोदींनी सांगितले. 

सोशल डिस्टन्सी फक्त रुग्णांसाठी नसून प्रत्येक नागरिकासाठी आहे, देशाच्या पंतप्रधानांसाठीही आहे. निष्काळजीपण जर असाच राहिला तर देशाला मोठी किंमत चुकवावी लागेल. देशातील अनेक भागात लॉक डाऊन करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला गंभीरतेनं घेतलं पाहिजे. आज रात्री १२ वाजल्यापासून देशात लॉक डाऊन करण्यात येत आहे, असे मोदींनी जाहीर केले. हा लॉक डाऊन जनता कर्फ्युचं पुढील पाऊल आहे. या लॉक डाऊनची आर्थिक किंमत देशाला मोजावी लागणार आहे. मात्र, देशातील प्रत्येक भारतीयाला वाचवणे हीच माझी, भारत सरकारची, राज्य सरकारची आणि स्थानिक संस्थांची प्राथमिकता असल्याचं मोदींनी म्हटलं. तसेच, मी हात जोडून सर्वांना विनंती करतोय, सध्या तुम्ही जिथं आहात तिथंच राहावे. पुढील २१ दिवसांसाठी हा लॉक डाऊन राहणार आहे, असे मोदींनी म्हटले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनIndiaभारतprime ministerपंतप्रधान