CoronaVirus : मजूर, बेघरांसाठी भाजपचे ‘कम्युनिटी किचन’; पक्षाची मोठी मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 05:52 IST2020-03-27T01:27:40+5:302020-03-27T05:52:05+5:30
CoronaVirus : भाजप अशा वर्गाच्या जेवणाचा प्रश्न मिटवण्यासाठी कम्युनिटी किचनचे जाळे (नेटवर्क) निर्माण करीत आहे. या जाळ््याच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर व बेघरांना जेवण दिले जाईल.

CoronaVirus : मजूर, बेघरांसाठी भाजपचे ‘कम्युनिटी किचन’; पक्षाची मोठी मोहीम
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या वर्गासाठी भाजपने मोठी मोहीम राबवण्याचे ठरवले आहे.
भाजप अशा वर्गाच्या जेवणाचा प्रश्न मिटवण्यासाठी कम्युनिटी किचनचे जाळे (नेटवर्क) निर्माण करीत आहे. या जाळ््याच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर व बेघरांना जेवण दिले जाईल. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेल्या आवाहनानुसार देशात कम्युनिटी किचनचे जाळे निर्माण करण्यास पक्षाने सुरवात केली आहे. पक्षाने म्हटले आहे की, आम्ही किमान एक हजार लोकांसाठी भोजन बनवू शकेल एवढ्या क्षमतेचे देशात सामुदायिक स्वयंपाकघरांचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचा उद्देश शहरातील गरिबांची गैरसोय टाळण्याचा आहे.
सहभागी होऊ इच्छिणाºया व्यक्ती आॅनलाईन करू शकतात अर्ज
- या मोहिमेशी संबंधित पक्षाच्या एका पदाधिकाºयाने सांगितले की, देशभरात ‘कम्युनिटी किचन’ चालवणाºया सक्षम वेगवेगळ््या संस्था आणि व्यक्तिंना या नेटवर्कमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या कामात सहभागी होऊ इच्छिणाºया व्यक्ती व संस्था यासाठी आॅनलाईन अर्ज करू शकतात.
- यासाठी त्यांना आॅनलाईन फॉर्म भरावा लागेल. अशा कम्युनिटी किचनला पक्षाकडून शक्य ती सगळी मदत दिली जाईल. या पुढाकाराला चांगला प्रतिसाद लाभला आहे. या मोहिमेचा परिणाम एकदोन दिवसांत दिसू लागेल, असे हा पदाधिकारी म्हणाला.
- भाजपने सामान्य लोक आणि कार्यकर्तेही या मोहिमेत सहभागी व्हावेत यासाठी सोशल मिडियाची मदत घेतली आहे. याकरिता टिष्ट्वटरवर ‘लेटस फीड द पूअर’ नावाची मोहीम चालवली जात आहे.
५ कोटी कुटुंबांना भाजप देणार भोजन
सध्या सुरु असलेल्या देशव्यापी ‘लॉकडाऊन’च्या काळात हातावर पोट असणाºया गरीब व वंचित वर्गातील नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी देशभरातील अशा पाच कोटी कुटुंबांच्या रोजच्या जेवणाची सोय करण्याची तयारी भारतीय जनता पार्टीने सुरु केली आहे.
या अडचणीच्या काळात आर्थिक स्थिती चांगली असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नऊ गरजूंचे पोट भरण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघातील नागरिकांशी मंगळवारी व्हिडिओ संवाद साधताना केले होते. हिच कल्पना पक्षाच्या पातळीवर राबविण्याचा भाजपाचा विचार
आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या पक्षप्रमुखांसोबत घेतलेल्या व्हिडिओ बैठकीत त्यासंबंधीचे निर्देश
दिले.
या ‘लॉकडाऊन’च्या काळात जे दररोज प्रत्येकी किमान पाच कुटुंबांच्या जेवणाची सोय करू शकतील असे देशभरातील एक कोटी पक्ष कार्यकर्ते निवडावेत, असे नड्डा यांनी राज्य पक्षप्रमुखांना सांगितले.
अशा प्रकारे पाच कोटी गरजू कुटुंबांच्या जेवणाची सोय होऊ शकेल. ही व्यवस्था गुरुवारपासूनच सुरु होऊ शकेल अशा प्रकारे तातडीने पावले उचलण्याच्या सूचना नड्डा यांनी दिल्या आहेत.