CoronaVirus: मोदी सरकारचा मोठा निर्णय; इंग्लंड, अमेरिका, जपानच्या लशींना मंजुरीची आवश्यकता नाही, अमित शाह म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 06:34 PM2021-04-19T18:34:04+5:302021-04-19T21:13:03+5:30

"कोरानाच्या नव्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. जगात जेथे-जेथे दुसरी अथवा तिसरी लाट आली, ती पहिल्या लाटेच्या तुलनेत अडीच ते तीन पट अधिक तिव्र आहे." (CoronaVirus)

CoronaVirus BJP Amit Shah said Centers decision England America Japan approved vaccines do not need approval  | CoronaVirus: मोदी सरकारचा मोठा निर्णय; इंग्लंड, अमेरिका, जपानच्या लशींना मंजुरीची आवश्यकता नाही, अमित शाह म्हणाले...

CoronaVirus: मोदी सरकारचा मोठा निर्णय; इंग्लंड, अमेरिका, जपानच्या लशींना मंजुरीची आवश्यकता नाही, अमित शाह म्हणाले...

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोनाने देशात थैमान घातले असतानाच केंद्रातील मोदी सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यातच, इंग्लंड, अमेरिका, जपान आणि डब्ल्यूएचओने ज्या कोरोना लशींना मंजुरी दिली आहे, त्या लशींना भारतात मंजुरी घेण्याची आवश्यकता नसेल, तसेच याचा परिणाम मे महिन्यापासून दिसायला सुरुवात होईल. असा विश्वास केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी दिला आहे. (BJP Amit Shah said Centers decision England America Japan approved vaccines do not need approval)

एका टीव्ही वाहिनीवरील चर्चेत सोमवारी शाह म्हणाले, कोरानाच्या नव्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. जगात जेथे-जेथे दुसरी अथवा तिसरी लाट आली, ती पहिल्या लाटेच्या तुलनेत अडीच ते तीन पट अधिक तिव्र आहे. यात जो नवा व्हायरस बनला आहे, तो कमी घात आहे, मात्र अधिक वेगाने पसरतो. कोरोनाच्या या नव्या व्हायरसवर वैज्ञानिक वेगाने काम करत आहेत.

देश सोडून चिनी कोरोना लस घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायत लोक? उत्तर वाचून व्हाल अवाक!

...म्हणून देशात ऑक्सिजन संकट -
देशातील ऑक्सिजनच्या कमतरतेचा उल्लेख करत शाह म्हणाले, काही राज्ये ऑक्सीजनचा स्टॉक करत आहेत, त्यांनी आपल्या रुग्णांसाठी, असे करायलाही हवे. केंद्र सरकारने ऑक्सीजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याचे योग्य वितरण व्हावे, यासाठी पंतप्रधानांनी पावले टाकायला सुरुवात केली आहे. एवढेच नाही, तर रेमेडेसिवीरच्या निर्यातीवर तत्काळ बंदी आणून तिचे उत्पादनही तीन पट वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही शाह म्हणाले.

लशींसंदर्भात बोलताना शाह म्हणाले, यूएस, यूके, जपान आणि WHOने ज्या लशींना मान्यता दिली आहे, त्या लशी लवकरच भारतात उपलब्ध होतील. आम्ही लसीकरणाची सुविधाही वाढवत आहोत. मे महिन्यापासूनच याचा निर्णयही दिसू लागेल.

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

व्हायरस रूप बदलतोय - 
गृह मंत्री शाह यांनी यावेळी स्पष्ट केले, की या निर्णयांचा आणि कोरोना पसरण्याचा काहीही संबंध नाही. कारण व्हायरस आपले स्वरूप बदलतो आणि औषधांसोबतही स्वतःला अॅडजस्ट करत आहे.

Web Title: CoronaVirus BJP Amit Shah said Centers decision England America Japan approved vaccines do not need approval 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.