शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : हृदयद्रावक! ...अन् चिमुकल्याने आईच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 16:32 IST

Coronavirus : कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहे. मात्र याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

जहानाबाद - कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहे. मात्र याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये एका चिमुकल्याने आपल्या आईच्या कुशीतच प्राण सोडला आहे. बिहारच्या शाहपूर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकला आजारी होता मात्र लॉकडाऊनमध्ये उपचारासाठी रुग्णवाहिका नसल्याने अखेर त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याचा आरोप मृत चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुर्था भागातील शाहपूरचे गावचा रहिवासी असलेल्या गिरिजेश कुमार यांचा तीन वर्षांचा चिमुकला गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. 

चिमुकल्याची तब्येत आणखी बिघडल्याने गिरिजेश यांनी मुलाला जवळच्या आरोग्य केंद्रात नेले. मात्र मुलाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जा असा सल्ला देण्यात आला. मात्र रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाच नव्हती. रुग्णालयाला विनंती करून ही त्यांनी रुग्णवाहिका दिली नाही. वेळीच उपचार न मिळल्याने अखेर चिमुकल्याने आपल्या आईच्या कुशीमध्येच शेवटचा श्वास घेतला. वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मुलाला जीव गमवावा लागल्याचा आरोप कुटुंबीय आणि स्थानिकांनी केला आहे. 

काही दिवसांपूर्वी भोपाळमध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. महिलेला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र रुग्णालयातील आयसीयुला कुलूप असल्याने जवळपास अर्धा तास महिला रुग्णवाहिकेतच होती. पुढचे उपचार मिळेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मीबाई असं 55 वर्षीय मृत्यू झालेल्या महिलेचं नाव होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यातच त्यांचा रक्तदाब वाढल्यानै कुटुंबियांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र कोरोनाच्या संशयामुळे लक्ष्मीबाई यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आलं. उपचारासाठी दाखल होताच रुग्णालयातील आयसीयुला कुलूप असल्याने त्यांना रुग्णवाहिकेतच अर्धा तास थांबावे लागले. आयसीयूचं कुलूप काही वेळाने उघडण्यात आलं मात्र उपचार सुरू होईपर्यंत लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाला. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : 'देशभरातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवा', केजरीवालांचा पंतप्रधानांना सल्ला

Coronavirus : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत तब्बल 2108 जणांचा मृत्यू

Coronavirus : जनधनचे पैसे आणायला गेलेल्या महिलांच्या हातातलं धनही गेलं; 10 हजाराच्या दंडानं गणित बिघडलं

Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत जगातील देशांसाठी भारत ठरला 'देवदूत'

Coronavirus : चिंताजनक! गेल्या 24 तासांत देशात 1035 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 7447 वर

Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करून दाम्पत्याची देशसेवा 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारDeathमृत्यूIndiaभारत