आनंदाची बातमी! तब्बल १८ दिवस व्हेंटिलेटरवर राहून ४ महिन्यांच्या चिमुकलीची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 11:11 AM2020-06-14T11:11:45+5:302020-06-14T12:12:35+5:30

CoronaVirus latest News : आंध्र प्रदेशातील चार महिन्यांच्या चिमुकलीने कोरोनाला हरवलं आहे. या घटनेची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे.

CoronaVirus : Andhra pradesh 4 month old recovers from corona virus after being on ventilator for 18 days | आनंदाची बातमी! तब्बल १८ दिवस व्हेंटिलेटरवर राहून ४ महिन्यांच्या चिमुकलीची कोरोनावर मात

आनंदाची बातमी! तब्बल १८ दिवस व्हेंटिलेटरवर राहून ४ महिन्यांच्या चिमुकलीची कोरोनावर मात

googlenewsNext

(Image credit- India today)

सध्या कोरोना व्हायरसशी संपूर्ण देश लढत आहे.  कोरोनाकाळात कधीही घडलेल्या कधीही न पाहिलेल्या अशा अनेक घटना आपल्याला पाहायला मिळाल्या. आजही अशाच एका घटनेबाबात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आंध्र प्रदेशातील चार महिन्यांच्या  चिमुकलीने कोरोनाला हरवलं आहे. या घटनेची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे १८ दिवस व्हेंटिलेटरवर राहूनही या चिमुरडीने कोरोनाशी यशस्वीपणे झुंज दिली आहे. 

18 दिनों तक वेंटिलेटर पर रहकर चार महीने की बच्ची ने दी कोरोना को मात

आंध्रप्रदेशातील विशाखापट्टमन येथिल  चार महिन्यांची मुलगी कोरोना संक्रमित झाली होती. त्यानंतर या चिमुरडीला रुग्णालयात भरती करण्यात आलं. १८ दिवसांपर्यंत ही मुलगी कोरोनाशी लढत होती. अखेर शुक्रवारी संध्याकाळी चाचणी केल्यानंतर  डॉक्टरांनी या मुलीला घरी घेऊन जाण्यास परवागनी दिली आहे.  
एक आदिवासी महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे ही चिमुरडी सुद्धा कोरोना संक्रमित झाली होती. मे महिन्यात या चिमुरडीला रुग्णालयात भरती करण्यात आलं.

18 दिनों तक वेंटिलेटर पर रहकर चार महीने की बच्ची ने दी कोरोना को मात

विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चिमुरडीला १८ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर तिचे टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यानंतर वीआयएमएस या रुग्णालयातून या चिमुरडीला डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना व्हायरसमुळे दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत असताना या चिमुरडीने संपूर्ण देशाला आशेचा किरण दाखवला आहे. शनिवारी आंध्रप्रदेशात २ मृतांसह २२२ नवीन कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत.

काळापुढे 'ते' ही  हरले! ३० वर्ष शिक्षकाची नोकरी केल्यानंतर मजुरीच्या कामाला लागले

ऐकावे ते नवलंच! एकिकडे डॉक्टर करत होते सर्जरी; अन् रुग्ण महिला चक्क वडे तळत बसली...

Web Title: CoronaVirus : Andhra pradesh 4 month old recovers from corona virus after being on ventilator for 18 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.