काळापुढे 'ते' ही  हरले! ३० वर्ष शिक्षकाची नोकरी केल्यानंतर मजुरीच्या कामाला लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 07:26 PM2020-06-12T19:26:11+5:302020-06-12T19:46:48+5:30

अनेकजण नोकरी जाण्याच्या विचाराने नैराश्याकडे गेले आहेत. तर अनेक कोरोनायोद्धा आपली जबाबदारी पार पाडत असताना सुद्धा त्यांच्या हाती पगाराचे पैसै मात्र लागलेले नाही.

Meet the english teacher who is doing work at construction site for earning | काळापुढे 'ते' ही  हरले! ३० वर्ष शिक्षकाची नोकरी केल्यानंतर मजुरीच्या कामाला लागले

काळापुढे 'ते' ही  हरले! ३० वर्ष शिक्षकाची नोकरी केल्यानंतर मजुरीच्या कामाला लागले

Next

(image credit- Indian express)

लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसची माहामारी यांमुळे वेगवेगळ्या स्तरावरील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांवर परिणाम दिसून आला. लोकांना कोरोनामुळे आपला जीवच नाही तर नोकरी मुठीत ठेवून  जगावं लागत होतं. अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेकजण नोकरी जाण्याच्या विचाराने नैराश्याकडे गेले आहेत. तर अनेक कोरोनायोद्धा आपली जबाबदारी पार पाडत असताना सुद्धा त्यांच्या हाती पगाराचे पैसै मात्र लागलेले नाही. असाच प्रकार केरळच्या शिक्षकासोबतही झाला आहे. लॉकडाऊनचा फटका जसा सर्वसामान्य नोकरी करत असलेल्या व्यक्तीला बसावा त्याचप्रमाणे गंभीर स्थिती या शिक्षकाची झाली आहे.

labour

इंडीयन एक्सप्रेसच्या  रिपोर्टनुसार पालेरी मीथल बाबू या व्यक्तीचे वय ५५ वर्ष आहे. केरळच्या ओंचियाम भागात हे गृहस्थ वास्तव्यास आहेत. गेल्या ३० वर्षांपासून पालेरी हे महाविद्यालयात इंग्रजी शिकवत होते. पण सध्या लॉकडाऊनमध्ये शाळा, महाविद्यालयं पूर्णपणे बंद असल्यामुळे त्यांना पोट भरण्यासाठी बांधकामाच्या कामात मजूरी करून पैसै कमवावे लागत आहेत.

पालेरी यांनी सांगितले की, ''मला माहित नाही शाळा, कॉलेज कधी पुन्हा सुरू होणार पण  कुटुंबाची जबाबदारी घ्यावीच लागणार आहे. मे महिन्यापासून मी बांधकामाच्या ठिकाणी  जायला सुरूवात केली. तेव्हापासून मला सकाळी  ७ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत काम करावं लागत होतं.  दिवसाचे ७५० रुपये रुपये मिळायचे. सध्या बांधकाम व्यवसायातही मंदीच चालू असल्यामुळे मला जास्त दिवस काम मिळालं नाही. फक्त ७ दिवसच माझ्या हाताशी काम होतं.'' 

पुढे ते म्हणाले की, ''माझं शिक्षणं मी इंग्रजी शाळेतून पूर्ण केलं. मग चेन्नईला गेलो. मग त्याच ठिकाणी पॅरॅलल महाविद्यालयात मला नोकरी मिळाली. सध्या मुलांच्या शिक्षणांसाठी मी कर्ज घेतले आहे. माझा मोठा मुलगा सिव्हील इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असून लहान मुलगा अकरावीत शिकत आहे. आता काहीही झाले तरी मी मागे हटणार नाही. परिस्थितीशी लढेन आणि मेहनत करणं थांबवणार नाही, असं पालेरी बाबू यांनी सांगितले.'' 

पोलिओ आणि कांजण्याप्रमाणे हर्ड इम्युनिटीने कोरोनालाही हरवता येऊ शकतं? वाचा रिपोर्ट

कोरोनावर १०० % प्रभावी ठरणार अश्वगंधा आणि गुळवेळ; रामदेव बाबांचा दावा, जाणून घ्या यामागचं कारण

Web Title: Meet the english teacher who is doing work at construction site for earning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.