शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

coronavirus: केरळात एकाच दिवसात आढळले ९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, मुख्यमंत्री विजयन यांचा माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 7:00 PM

देशातील बहुतांश राज्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

रांची - राज्यात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढत चाललं असून, रुग्णांची संख्यादेखील ११६ वरून १२२वर गेली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधित आढळून आले आहेत. मुंबईतल्या ४ जणांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मुंबईत नव्याने ५ आणि ठाणे येथे १ रुग्ण असे सहा रुग्ण आढळून आले आहेत. तर केरळ राज्यातही आज दिवसभरात ९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. केरळचेमुख्यमंत्री पनराई विजय यांनी याबाबत माहिती दिली. 

कोरोना विषाणूनं भारतात थैमान घातलं असून, बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५६०वर गेली असून, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४६ जणांची या जीवघेण्या रोगातून सुखरूप मुक्तता झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या १०७वर गेली असून, केरळमध्ये कोरोनानं बाधित झालेले १०५ रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे या कोरोनाग्रस्तांमध्ये ४१ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

देशातील बहुतांश राज्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा १२२ वर पोहचला आहे. तर, त्याखालोखाल केरळमध्ये ११८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. केरळमध्ये आज ९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये, दुबईहून आलेल्या रुग्णांची संख्या ४ आहे, एकजण लंडनरिटर्न आहे, तर १ जण फ्रान्सवरुन मायदेशी परतला आहे. त्यासोबतच तिघे स्थानिकच आहेत, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगतिले. या नवीन ९ कोरोनाबाधित रुग्णांसह केरळमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११८ वर पोहोचली आहे, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, राज्यात मुंबई शहर आणि उपनगर ४१, पिंपरी चिंचवड १२, पुणे १९, नवी मुंबई ५, कल्याण ५, नागपूर ४, यवतमाळ  ४, सांगली ४, अहमदनगर ३, ठाणे ३, सातारा २, पनवेल १, उल्हासनगर १, औरंगाबाद १, रत्नागिरी १, वसई-विरार १ अशा रुग्णांचा समावेश आहे. राज्यात मंगळवारी कोरोनाबाधितांचा आकडा १०७ वर पोहोचला होता, तो आज १२२ वर आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत असताना रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी पालिकेचे कर्मचारी, अधिकारी रुग्ण बरे कसे होतील यासाठी प्रयत्न करत आहेत. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाची लागण झालेल्या १२ रुग्णांना बरे करण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्यांमध्ये ते कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य विभागाला रुग्णांना बरे करण्यात यश आले आहे. केंद्र आणि राज्य सरकाराच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या १५ रुग्णांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळChief Ministerमुख्यमंत्री