Coronavirus: देशातील प्रसिद्ध विद्यापीठात कोरोनाचा कहर, २० दिवसांत १६ फॅकल्टी आणि १० निवृत्त प्राध्यापकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 07:17 PM2021-05-08T19:17:26+5:302021-05-08T19:19:44+5:30

Coronavirus in AMU: भयाण रूप धारण केलेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वसामान्यांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांचा बळी जात आहे.

Coronavirus: 16 faculty and 10 former professors of AMU die due to coronavirus in last 20 Days | Coronavirus: देशातील प्रसिद्ध विद्यापीठात कोरोनाचा कहर, २० दिवसांत १६ फॅकल्टी आणि १० निवृत्त प्राध्यापकांचा मृत्यू

Coronavirus: देशातील प्रसिद्ध विद्यापीठात कोरोनाचा कहर, २० दिवसांत १६ फॅकल्टी आणि १० निवृत्त प्राध्यापकांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील अलिगड मुस्लिम विद्यापीठातही कोरोनाचा कहरगेल्या २० दिवसांचा विचार केल्यास १६ प्राध्यापकांचा आणि १० निवृत्त प्राध्यापकांचा मृत्यू विद्यापीठाचे कुलगुरू तारिक मन्सुर यांच्या मोठ्या भावाचासुद्धा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा जोरदात तडाखा सध्या देशाला बसत आहे. भयाण रूप धारण केलेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वसामान्यांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांचा बळी जात आहे. (Coronavirus in AMU) देशातील प्रसिद्ध विद्यापीठ असलेल्या अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्येही कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या विद्यापीठाने कोरोनाचे भयानक रूप पाहिले असून, मागच्या २० दिवसांत या विद्यापीठामध्ये १६ फॅकल्टी आणि १० निवृत्त प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. (16 faculty and 10 former professors of AMU die due to coronavirus in last 20 Days)

देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे २४ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर चार हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमधील अलिगड मुस्लिम विद्यापीठातही कोरोनाचा कहर सुरू आहे. काल विद्यापीठातील दोन प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २० दिवसांचा विचार केल्यास १६ प्राध्यापकांचा आणि १० निवृत्त प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू तारिक मन्सुर यांच्या मोठ्या भावाचासुद्धा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. 

विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या कोविड वॉर्डमध्ये काही प्राध्यापकांसह एकूण १६ जणांवर उपचार सुरू आहेत. एएमयूचे प्रवक्ते शैफई कि़डवई यांनी सांगितले की, वैद्यकीय विभागाचे प्रमुख प्रा. शादाब अहमद खान आमि संगणक विभागातील प्राध्यापक रफिकूल जमान खान ५५ यांचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. 

तसेच विद्यापीठाचे कुलगुरू मन्सूर यांचे भाऊ फारुख यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. ते युनिव्हर्सिटी कोर्टचे माजी सदस्य आणि मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फ्रन्सचे सदस्य होते. दरम्यान, संस्कृत पंडित आणि संस्कृत विभागाचे माजी अध्यक्ष प्रा. खालिद बिन युसुफ यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ऋग्वेदामध्ये डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले मुस्लिम विद्वान होते.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: 16 faculty and 10 former professors of AMU die due to coronavirus in last 20 Days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app