शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
4
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
5
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
7
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
8
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
9
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
10
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
11
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
12
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
13
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
14
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
15
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
16
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
17
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
19
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
20
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाशी झुंज अपयशी, १४ महिन्याच्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 07:17 IST

CoronaVirus : गुजरातमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे १६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

अहमदाबाद : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये अवघ्या १४ महिन्याच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. गेल्या रविवारी या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांने अखेरचा श्वास घेतला. 

गुजरातमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. याआधी गुजरातमध्ये मंगळवारी सूरत आणि पाटनमध्ये दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन सुरु केले आहे. तरीही कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होते असल्याचे दिसून येत आहे.

देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४७८४ वर पोहोचली आहे. तर १२४ लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, कोरोनावर मात करत आतापर्यंत ३२५ लोक या आजारातून बरे झाले आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रात एक हजारहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. तसेच, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५०८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

सात देशांमध्ये कोरोनाचे ७८ हजारहून अधिक जणांचा बळीजगात कोरोना बाधितांची संख्या १३ लाख, ७८ हजार,५२७ वर गेली असून आतापर्यंत या आजाराने ७८ हजार, ११० जणांचा बळी घेतला आहे. आजच्या घडीला सर्वाधिक म्हणजे ३ लाख, ७७ हजार, ५०० एवढे कोरोनाचे रुग्ण एकट्या अमेरिकेत असून गेल्या २४ तासांत तिथे ११ हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे.  अमेरिकेत मृतांची संख्यादेखील वाढत असून मंगळवारी रात्रीपर्यंत आकडा ११ हजार, ८०० वर गेला. इटलीमध्ये मृतांची संख्या १६ हजार, ५२३ तर स्पेनमध्ये १३ हजार, ८०० वर गेली आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत ८ हजार, ९०० तर ब्रिटनमध्ये ६ हजार, १६० जण मरण पावले आहेत. इराण आणि चीन या दोन देशांमध्ये मिळून मृतांचा आकडा सुमारे ७ हजार झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जे ७८ हजार लोकं मरण पावले त्यापैकी ६४ हजार जण या सात देशांमधीलच आहेत. मात्र, आतापर्यंत सुमारे तीन लाख रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGujaratगुजरातIndiaभारत