शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

Corona Virus Vaccine : देशातील पहिली ‘एमआरएनए’ आधारीत लस 'जिनोव्हा'ची असणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 11:47 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटला भेट देऊन लसीच्या उत्पादनासह वितरण, चाचण्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला होता.

पुणे : जिनोव्हा बायोफार्मा या कंपनीकडून कोरोनावर देशातील पहिले ‘एमआरएनए’ या तंत्रज्ञानावर आधारीत ‘एजीसी०१९’ ही लस विकसित केली जात आहे. वर्षअखेरीस या लसीच्या मानवी चाचणीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. ही लसीची २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात साठवणुक करता यावी, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लस प्रत्यक्षात आल्यानंतर त्याचे वितरण व साठवणुक करणे सहज शक्य होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटला भेट देऊन लसीच्या उत्पादनासह वितरण, चाचण्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला होता. तर सोमवारी जिनोव्हा बायोफार्मा या कंपनीकडून तयार केल्या जात असलेल्या लसीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून माहिती घेतली. अमेरिकेतील सिअ‍ॅटेल येथील एचडीटी बायोटेक कॉर्पोरेशनच्या सहकार्याने जिनोव्हाकडून ही लस विकसित केली जात आहे. हिंजवडी येथील कंपनीच्या प्रयोगशाळेस १०० देशांतील राजदुतांच्या भेटीचे नियोजनही सुरू आहे. दरम्यान, कंपनीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, जिनोव्हाकडून या आव्हानात्मक परिस्थितीत वेगाने काम सुरू असून या लसीच्या मानवी चाचण्यांना वर्षअखेरीस सुरूवात होणार आहे. लवकर मान्यता मिळाल्यास त्याआधाही सुरूवात होऊ शकते.

भारतात विकसित होत असलेल्या बहुतेक लसी विषाणुतील प्रोटीन्सचा आधार असलेल्या आहेत. तर जिनोव्हाची लस ‘एमआरएनए’ वर आधारलेली आहे. या पध्दतीमुळे लस बनविण्याचा कालावधी अत्यंत कमी होऊ शकतो. तसेच त्याचे उत्पादनही वेगाने करता येऊ शकतो.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंग यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, ‘ही लस २ ते ८ अंश सेल्सिअसदरम्यान साठविता येऊ शकते. त्यादृष्टीने सुरूवातीपासूनच वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरू आहेत. या लसीच्या चाचण्यांना केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने निधी दिला आहे. मानवी चाचण्यांना मान्यतेसाठी भारतीय नियामक संस्थेकडे परवानगी मागितली आहे. या चाचण्या मार्चपर्यंत पुर्ण होतील. ‘एमआरएनए’ वर आधारलेल्या लसीच्या भारतातील या पहिल्या मानवी चाचण्या असतील.’ ------------‘एमआरएनए’ आधारीत या लसीद्वारे कोरोना संक्रमित शरीरातील पेशींना विषाणूंशी लढा देण्यास सक्षम अशी प्रतिजैवके तयार करण्यास सज्ज केले जाते. एमआरएनए रचनेमुळे ही लस दीर्घ काळ प्रतिजैवके निर्मितीसाठी पुरक ठरते. तसेच विपरीत परिणामांची शक्यता कमी होते, असा कंपनीचा दावा आहे.-----------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयCentral Governmentकेंद्र सरकार