Corona Virus Vaccine: Covishield vaccine unsafe; Serious allegation of volunteer wife : Serum refutes the allegation | "कोविशील्ड" लस असुरक्षित ? चेन्नईतील स्वयंसेवकाच्या पत्नीचा गंभीर आरोप : सिरमने आरोप फेटाळले 

"कोविशील्ड" लस असुरक्षित ? चेन्नईतील स्वयंसेवकाच्या पत्नीचा गंभीर आरोप : सिरमने आरोप फेटाळले 

पुणे : चेन्नई येथील ४० वर्षीय स्वयंसेवकाच्या  ''कोविशिल्ड'' लसच्या सुरक्षिततेबाबत गंभीर आरोप केले आहेत. लस दिल्यानंतर मेंदू (न्यूरो) लॉजिकल समस्या निर्माण झाल्याची तक्रार करत सिरम इन्स्टिट्यूटसह ऑक्सफर्ड विद्यापीठ व ॲस्ट्राझेनिका कंपनीला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. तसेच चाचण्या थांबविण्याची मागणीही केली आहे. सिरमने मात्र हे आरोप फेटाळून लावत स्वयंसेवकाविरुद्ध १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान भरपाई मागण्याचा इशारा दिला आहे. 

भारतात सिरम मार्फत कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. याअंतर्गत चेन्नई येथील एका ४० वर्षीय व्यक्तीला १ ऑक्टोबर रोजी पहिला डोस देण्यात आला होता. लसीकरणानंतर त्याला मेंदूचा गंभीर आजार झाल्याचा आरोप या व्यक्तीने नोटिसमध्ये केला आहे. लसीच्या डोसामुळेच ही समस्या उद्भवल्याचे वैदयकीय तपासणीमध्ये स्पष्ट झाल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला आहे. तसेच लसीच्या चाचण्या, उत्पादन व वितरण थांबविण्याची मागणी ही या व्यक्तीने केली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच २ आठवड्यात पाच कोटी देण्यात यावे अशी मागणी देखील स्वयंसेवकाच्या पतीनीने केली आहे. 

दरम्यान , सिरमने हे आरोप फेटाळून लावले आहेत. स्वयंसेवकांची आरोग्य स्थिती व चाचणीचा संबंध नाही. ते चुकीच्या पद्धतीने आपल्यातील समस्यांचा दोष चाचणीला देत आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण चुकीच्या पद्धतीने संस्थेची बदनामी करत आहेत. संस्थेने स्पष्ट केले आहे. 
-----
सिरम कंपनी या व्यक्तीविरोधात ठोकणार १०० कोटींचा दावा
या व्यक्तीला होणाऱ्या त्रासाशी कोविशील्ड लसीचा काहीही संबंध नसल्याची त्यांना पूर्वीच सांगण्यात आले आहे.परंतु तरीदेखील याव्यक्तीकडून कंपनीला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे.या व्यक्तीच्या हेतूबाबत आम्हाला शंका उपस्थित होत असून आम्ही त्यांच्या विरोधात १०० कोटींचा दावा ठोकणार असल्याची माहिती सिरम कंपनीने दिली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Virus Vaccine: Covishield vaccine unsafe; Serious allegation of volunteer wife : Serum refutes the allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.