CoronaVirus Update : चिंता वाढली! केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 09:39 PM2021-09-16T21:39:56+5:302021-09-16T21:43:03+5:30

देशातील कोरोना रुग्णसंख्येत 4 दिवसांनंतर पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सलग चार दिवस कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत होती. रोज 30 हजारांपेक्षा कमी रुग्ण समोर येत होते. मात्र, गुरुवारी सकाळी 30 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत.

Corona Virus india cases increased again in kerala increased cases across the country raised concerns | CoronaVirus Update : चिंता वाढली! केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं

CoronaVirus Update : चिंता वाढली! केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं

Next

नवी दिल्‍ली - गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 30,570 नवे रुग्ण समोर आले आहेत. याच बरोबर देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,33,47,325 वर पोहोचली आहे. या नव्या आकडेवारीत 22,182 रुग्ण एकट्या केरळमध्ये समोर आले आहेत. या काळात देशात 431 लोकांचा मृत्यू झाला. यात 182 मृत्यू एकट्या केरळमध्ये नोंदविण्यात आले. गुरुवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत 58.26 लाख कोरोना लसीचे डोस टोचले गेले आहेत. (Corona Virus india cases increased again in kerala increased cases across the country raised concerns)

देशातील कोरोना रुग्णसंख्येत 4 दिवसांनंतर पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सलग चार दिवस कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत होती. रोज 30 हजारांपेक्षा कमी रुग्ण समोर येत होते. मात्र, गुरुवारी सकाळी 30 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत.

मासिक पाळीत समस्या, कोरोना लसीचा साइड इफेक्ट? 'या' देशात तब्बल 35,000 महिला प्रभावित

केरळमध्ये पुन्हा वाढले रुग्ण -
सध्या देशात 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण एकट्या केरळमधून समोर येत आहेत. गुरुवारी सकाळी कोरोनाचे 17,681 नवे रुग्ण समोर आले. तर 208 जणांचा मृत्यू झाला. याच बरोबर एकूण रुग्ण संख्या वाढून 44 लाख 24 हजार 46 झाली आहे. तर मृतांचा आकडा 22,987 वर पोहोचला आहे. येथील संक्रमणदर 18 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. तर गुरुवारी सायंकाळी केरलमध्ये 22,182 नवे रुग्ण समोर आले असून 26,563 लोक बरे झाले आहेत. तर 178 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोविशील्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! समोर आले 4 नवे Side Effects, चुकूनही करू नका दुर्लक्ष

अशी आहे महाराष्ट्राची स्थिती -
गेल्या चोवीस तासांत महाराष्ट्रात 3 हजार 595 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे चोवीस तासांत राज्यात 3 हजार 240 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 63 लाख 20 हजार 310 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.06 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात एकूण 45 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.12 टक्के इतका आहे.
 

Web Title: Corona Virus india cases increased again in kerala increased cases across the country raised concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app