Corona Vaccine : मासिक पाळीत समस्या, कोरोना लसीचा साइड इफेक्ट? 'या' देशात तब्बल 35,000 महिला प्रभावित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 08:17 PM2021-09-16T20:17:56+5:302021-09-16T20:18:20+5:30

लंडन - जगात सर्वात पहिले कोरोना लसीकरण सुरू करणाऱ्या देशांत सामील असलेल्या इंग्लंडमध्ये आता त्याचे दुष्परिणामही हळूहळू समोर येऊ ...

Corona Vaccine side effect Are painful periods a side effect of the corona vaccines 35000 women in England report irregular menstrual cycles | Corona Vaccine : मासिक पाळीत समस्या, कोरोना लसीचा साइड इफेक्ट? 'या' देशात तब्बल 35,000 महिला प्रभावित

Corona Vaccine : मासिक पाळीत समस्या, कोरोना लसीचा साइड इफेक्ट? 'या' देशात तब्बल 35,000 महिला प्रभावित

Next

लंडन - जगात सर्वात पहिले कोरोना लसीकरण सुरू करणाऱ्या देशांत सामील असलेल्या इंग्लंडमध्ये आता त्याचे दुष्परिणामही हळूहळू समोर येऊ लागले आहेत. जवळपास 35,000 ब्रिटिश महिलांनी दावा केला आहे की, कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतर त्यांच्या मासिक पाळीत व्यत्यय आला होता. एवढेच नाही तर, लसीकरणानंतर आपल्याला अनियमित आणि वेदनादायक मासिक पाळीला सामोरे जावे लागले, असा दावाही अनेक महिलांनी केला आहे. यांपैकी अधिकांश महिलांची ही समर्या एक पिरियड सायकल पूर्ण झाल्यानंतर संपलीही. सांगण्यात येते, की यांपैकी अधिकांश प्रकार फायझर आणि मॉडर्ना लसीशी संबंधित आहेत. (Corona Vaccine side effect : Are painful periods a side effect of the corona vaccines 35000 women in England report irregular menstrual cycles)

लसीकरणाचा आणि मासिक पाळीचा काहीही संबंध नाही - 
इंपिरियल कॉलेज लंडन येथे रिप्रोडक्टिव इम्यूनलॉजीच्या एक लेक्चरर डॉ. व्हिक्टोरिया माले यांच्या डेटा अॅनालिसिस रिपोर्टनुसार, लसीकरणामुळे अद्याप प्रजनन संबंधी कुठलीही तक्रार समोर आलेली नाही. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये (बीएमजे) लिहिताना, त्यांनी म्हटले आहे, की या औषधाच्या तपासणीसाठी आणखी संशोधनाची गरज आहे. यूकेच्या ड्रग वॉचडॉग द मेडिसिन्स अँड हेल्थकेयर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (MHRA)ने अद्याप कोरोना लस आणि मासिक पाळी यांच्यात कुठल्याही प्रकारचा संबंध असल्याचे स्वीकारलेले नाही. 

कोविशील्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! समोर आले 4 नवे Side Effects, चुकूनही करू नका दुर्लक्ष

यामुळे होऊ शकतो मासिक पाळीवर परिणाम -
एमएचआरएने म्हटले आहे की, आजपर्यंत पूर्ण केलेले कठोर मूल्यांकन मासिक पाळीतील बदल तसेच संबंधित लक्षणे आणि कोविड लस यांच्यातील कुठल्याही लिंकचे समर्थन करत नाही. डॉ. माले यांनी म्हटले आहे की, लसीच्या डोससाठी शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती मासिक पाळीत बद घडवून आणू शकते. आधीच्या अभ्यासाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, एचपीव्ही लसीनेही सुरुवातीच्या काही दिवसांत महिलांच्या मासिक पाळीत समस्या निर्माण झाली होती. मात्र, काही इतर तज्ज्ञांनी डॉ माले यांचा सिद्धांत फेटाळला असून लसीकरणानंतर मासिक पाळिची समस्या सामान्य आहे, असे म्हटले आहे.

अतापर्यंत 30000 हून अधिक केसेस -
डॉ माले यांनी म्हटले आहे, 'प्रायमरी केअर डॉक्टर आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये काम करनारे लोक लसीकरनानंतर लगेचच अशा घटनांचा अनुभव येणाऱ्या लोकांशी संपर्क साधत आहेत. अशा घटनांचे साधारणपणे 30000 हून अधिक रिपोर्ट एमएचआरएच्या येलो कार्ड सर्व्हिलान्स स्किमला देण्यात आले होते. 

Web Title: Corona Vaccine side effect Are painful periods a side effect of the corona vaccines 35000 women in England report irregular menstrual cycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app