शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

खूशखबर! खासगी रुग्णालयांमध्ये  २५० रुपयांत मिळेल कोरोनावरील लस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 7:04 AM

Corona Vaccination: दुसऱ्या टप्प्यासाठी शुल्क निश्चित, लसीकरण साेमवारपासून

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काेराेना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविला आहे. लस घेण्यास पात्र व्यक्ती खासगी रुग्णालयातून काेराेनाची लस टाेचून घेऊ शकतात. त्यासाठी २५० रुपये एका डाेसचे शुल्क निश्चित केले आहे. लसीकरणामध्ये खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविण्याबाबत केंद्र सरकारने संकेत यापूर्वी दिले हाेते.

काेराेना लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारीपासून सुरू झाला हाेता. आता दुसरा टप्पा साेमवार, १ मार्चपासून सुरू हाेत आहे. त्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच इतर आजार असलेले ४५ वर्षांवरील नागरिक लस घेऊ शकतात. त्यासाठी २५० रुपये एका डाेससाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामध्ये लसीची किंमत १५० रुपये असून १०० रुपये सेवेसाठी आकारण्यात येणार आहेत. खासगी रुग्णालये यापेक्षा जास्त शुल्क आकारू शकत नाहीत, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हेच शुल्क राहणार आहे, असे राष्ट्रीय आराेग्य मिशनच्या अतिरिक्त सचिव वंदना गुरनानी यांनी स्पष्ट केले. सरकारी रुग्णालयांमध्ये लसीकरण माेफत राहणार आहे.दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाबाबत विविध राज्यांच्या आराेग्य सचिवांची २६ फेब्रुवारीला बैठक झाली. त्यात याबाबत केंद्रीय आराेग्य विभागातर्फे माहिती देण्यात आली हाेती.  

सोबत घेऊन जाn लाभार्थ्यांनी आधार कार्ड, निवडणूक आयाेगाचे ओळखपत्र किंवा सरकारने दिलेले ओळखपत्र साेबत नेणे आवश्यक आहे. n तसेच इतर आजार असलेल्या ४५ ते ५९ या वयाेगटातील नागरिकांसाठी डाॅक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.पूर्वनाेंदणी आवश्यकइच्छुक लाभार्थ्यांनी ‘काेविन २.०’ तसेच ‘आराेग्य सेतू’ या ॲपवर नाेंदणी करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष लसीकरण केंद्रात जाऊनही नाेंदणी करता येईल.

या रुग्णालयांमध्ये घेता येईल लससार्वजनिक आराेग्य केंद्र |  कम्युनिटी आराेग्य केंद्र  | आयुष्मान भारत आराेग्य केंद्र | उपजिल्हा रुग्णालये | जिल्हा रुग्णालये | वैद्यकीय महाविद्यालयाची रुग्णालये | ‘सीजीएचएस’चे आणि आयुष्मान भारत पंतप्रधान जन आराेग्य याेजनेच्या पॅनेलमधील खासगी रुग्णालयेयाच खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुपये शुल्क देऊन लस घेता येईल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या