शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Corona Vaccine : ‘स्पुटनिक-व्ही’ लसीला मिळाला हिरवा कंदील, पुढील महिन्यात लस बाजारात दाखल होऊ शकते

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 4:30 AM

Sputnik-V vaccine : सुरुवातीला ‘स्पुटनिक-व्ही’ लस रशियाकडून आयात केली जाईल. लसीची परिणामकारकता ९१.६ टक्के असून मॉडर्ना आणि फायझर यांच्या लसींनंतर जगात सर्वाधिक दिली जाणारी लस म्हणून ‘स्पुटनिक-व्ही’चा लौकिक आहे.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : देशातील लसीकरणाला वेग देण्यासाठी ‘स्पुटनिक-व्ही’ या रशियन बनावटीच्या लसीला हिरवा कंदील देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. ‘स्पुटनिक-व्ही’च्या आपत्कालीन परिस्थितीतील वापराला मंजुरी देण्याची शिफारस विषय तज्ज्ञांच्या समितीने (एसईसी) भारताच्या औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) केली असून पुढील महिन्यात ही लस बाजारात दाखल होऊ शकते. किंमत आणि साठवण या दोनच अडचणी तूर्तास आहेत.सुरुवातीला ‘स्पुटनिक-व्ही’ लस रशियाकडून आयात केली जाईल. लसीची परिणामकारकता ९१.६ टक्के असून मॉडर्ना आणि फायझर यांच्या लसींनंतर जगात सर्वाधिक दिली जाणारी लस म्हणून ‘स्पुटनिक-व्ही’चा लौकिक आहे. रशियन यंत्रणांनी लसीचे परिणाम १ एप्रिल रोजी केंद्राला सादर केले होते. त्याबाबत केंद्र समाधानी असल्याचे समजते.  

किंमत किती?- ‘‘स्पुटनिक-व्ही’ लसीच्या किमतीवरून सध्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्याशी चर्चा सुरू आहे. - कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींची किंमत १५० ते २१० रुपयांच्या श्रेणीत असल्याने ‘स्पुटनिक-व्ही’ लसही त्याच किमतीत प्राप्त व्हावी, यासाठी केंद्र सरकार आग्रही आहे. - इतर देशांमध्ये ‘स्पुटनिक-व्ही’ची किंमत ७५० रुपये आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या