शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: आधी कोविशील्डचा डोस, नंतर ५ मिनिटांनी कोवॅक्सीन टोचली; बेजबाबदारपणामुळे अशी झाली महिलेची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 12:19 IST

बिहारची राजधानी पाटण्यातील धक्कादायक प्रकार; महिलेची प्रकृती खालावली

पाटणा: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा असल्यानं लसीकरण मोहीम थंडावली आहे. तर काही ठिकाणी लसीकरणादरम्यान कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर येत आहे. बिहारची राजधानी पाटण्यात एक गंभीर प्रकार घडला आहे. कोरोना लस घेतल्यानंतर किती दिवसांनंतर मिळतं 'सुरक्षा कवच'?; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

पाटण्यातील पुनपुन परिसरात वास्तव्यास असलेल्या सुनिला देवी बुधवारी कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गेल्या होत्या. मात्र केंद्रावर त्यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. सुनिला यांना अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरानं कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. विशेष म्हणजे दोन्ही डोस वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसींचे होते. सुनिला यांना पहिला डोस कोविशील्डचा, तर दुसरा डोस कोवॅक्सीनचा देण्यात आला.Pfizer आणि Moderna लसीमुळे प्रजनन क्षमतेत घट होत नाही - स्टडी

अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरानं महिलेला दोन डोस देण्यात आले. त्याचा परिणाम थोड्याच वेळात तिच्या शरीरावर दिसू लागला. रात्रभर महिलेला ताप आला. मात्र तिच्या तपासणीसाठी डॉक्टर, नर्स यापैकी कोणीही आलं नाही. या घटनेमुळे लसीकरण केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

महिलेला अवघ्या ५ मिनिटांत दोन डोस देण्यात आल्याची चूक समोर येताच तिच्यावर २४ तास लक्षात ठेवण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र तिच्या देखरेखीसाठी लसीकरण केंद्रातून कोणीही आलं नाही. रात्री महिलेला अशक्तपणा जाणवू लागला. त्यावेळी तिच्या कुटुंबियांनी तिला ग्लुकोज दिलं. सुनिला यांच्यासोबत काहीतरी अघटित घडणार नाही, अशी भीती त्यांच्या कुटुंबियांना वाटत आहे. सुनिला यांच्या बाबतीत घडलेला प्रकार पाहून ग्रामस्थ धास्तावले आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या