Pfizer आणि Moderna लसीमुळे प्रजनन क्षमतेत घट होत नाही - स्टडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 10:06 AM2021-06-19T10:06:51+5:302021-06-19T10:07:35+5:30

corona vaccine : फायझर, मॉडर्ना या कोरोना लसीमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नसल्याचे एका संशोधनात समोर आले आहे.

pfizer moderna corona vaccine dont lower sperm count says study covid vaccination male fertility sperm levels | Pfizer आणि Moderna लसीमुळे प्रजनन क्षमतेत घट होत नाही - स्टडी

Pfizer आणि Moderna लसीमुळे प्रजनन क्षमतेत घट होत नाही - स्टडी

googlenewsNext

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी  फायझर, मॉडर्ना यांनी विकसित केलेली कोरोना लस घेतल्यास प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम लागण्याची शक्यता एका संशोधनामुळे निर्माण झाली आहे. फायझर, मॉडर्ना या कोरोना लसीमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नसल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. (pfizer moderna corona vaccine dont lower sperm count says study covid vaccination male fertility sperm levels)

'जामा' या नियताकालिकेत प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, १८ ते ५० या वयोगटातील ४५ निरोगी व्यक्तींना या संशोधनात सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांना फायजर-बायोएनटेक आणि मॉडर्नाच्या एमआरएनए कोविड लस देण्यात आली होती. या संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्तींना यापूर्वीदेखील प्रजननाबाबत कोणतीही समस्या नव्हती.

लस टोचण्यापूर्वी संशोधनात ९० दिवस आधी कोरोनाग्रस्त किंवा लक्षणं असलेल्या लोकांचा समावेश करण्यात आला नाही. संशोधनात सहभागी झालेल्या पुरुषांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्याआधी वीर्याचे नमुने घेण्यात आले. तर, लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ७० दिवसांनी पुन्हा वीर्याचे नमुने घेण्यात आले होते. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार प्रशिक्षित तज्ज्ञांनी विविध मानकांवर शुक्राणूंची तपासणी केली. 

या दोन्ही वेळेस वीर्यातील शुक्राणूंच्या संख्येत फरक नसल्याचे दिसून आले.संशोधनात सहभागी असलेल्या अमेरिकेतील मियामी विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याच्या भीतीमुळे अनेकजण लस घेण्यास घाबरत आहेत. त्यामुळे या शंका दूर करण्याची अधिक आवश्यकता आहे.

फायझर, मॉडर्ना लसींबाबत अफवा
अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये कोरोना लसींविरोधात अफवा सुरू होत्या. फायझर, मॉडर्नाची लस घेतल्यानंतर शुक्राणूंची संख्या कमी होत असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यामुळे अनेकजणांमध्ये भीती निर्माण झाली होती. मात्र, आता कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर शुक्राणूंच्या संख्येवर कोणताही परिणाम होत नसल्याचे संशोधनात समोर आले आहे.
 

Web Title: pfizer moderna corona vaccine dont lower sperm count says study covid vaccination male fertility sperm levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.