शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

इस्लामिक ट्रस्टकडून शेकडो हिंदू मुलींचे धर्मांतर, पोलिसांच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 9:13 AM

या प्रकरणात मुख्य आरोपी बनवण्यात आलेल्या व्यक्तीवर वडोदरा येथे 100 ते 200 हिंदू मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर करुन लग्न लावल्याचा आरोप आहे.

वडोदरा: परकीय निधीच्या मदतीने एका ट्रस्टने शेकडो तरुणींचे धर्मांतर(Conversion) केल्याचे प्रकरण समोर आले आहे. गुजरातच्या(Gujarat) वडोदरा येथे 100 ते 200 हिंदू मुलींचे पैशाच्या जोरावर इस्लाममध्ये धर्मांतर करुन त्यांचे लग्न लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वडोदरा पोलिसांनी मंगळवारी आरोपपत्र दाखल केले आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात धार्मिक ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक आणि त्याच्या सहकाऱ्यांवर परदेशी निधीद्वारे लोकांना अवैधरित्या इस्लाममध्ये धर्मांतरित करणे, मशिदी बांधणे, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलकांना मदत करणे आणि दिल्ली दंगलीचा आरोप आहे. या 1860 पानांच्या आरोपपत्रात, 5 आरोपींची नावे आहेत.

आरोपपत्रात पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद उमर गौतम हा दिल्लीचा रहिवासी असून त्याने 100 ते 200 मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर करून त्यांचे लग्न लावून दिले होते. याशिवाय वडोदरास्थित AFMI चॅरिटेबल ट्रस्टचा व्यवस्थापकीय विश्वस्त सलाहुद्दीन शेख याच्यावर ट्रस्ट फंडाच्या मदतीने विविध समुदायांतील सुमारे 1,000 लोकांचे धर्मांतर केल्याचा आरोप आहे.

दोन आरोपी फरार

पोलिसांनी सांगितले की, इस्लाम धर्म स्वीकारलेल्यांमध्ये सुमारे 10 लोक बहिरे आहेत ज्यांना ऐकू येत नाही. त्याचवेळी शेखकडे काम करणारा गौतम, शेख आणि मोहम्मद मन्सूरी यांना या प्रकरणी यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. वडोदरा पोलिसांनी भरूच जिल्ह्यातील रहिवासी असलेला लंडनस्थित अब्दुल्ला फफडावाला आणि यूएईचा रहिवासी मुस्तफा थानावाला यांना फरार घोषित केले आहे.

गौतमला यापूर्वी अटक केलेलोकांची फसवणूक करुन इस्लाममध्ये धर्मांत केल्याप्रकरणी यूपी एसटीएफने या वर्षी जूनमध्ये गौतमला अटक केली होती. याप्रकरणी ऑगस्टमध्ये वडोदरा पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने शेख, गौतम आणि इतर आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. ज्यामध्ये विविध समुदायांमध्ये धार्मिक द्वेषाला प्रोत्साहन देणे, खोट बोलून गुन्हेगारी कट रचणे अशा विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :GujaratगुजरातHinduहिंदूMuslimमुस्लीमPoliceपोलिस