शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

शेहला रशीद देशविरोधी कारवायांमध्ये सामील, माझ्या जीवाला धोका; वडिलांचा गंभीर आरोप!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 1, 2020 14:39 IST

मुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सामील आहे. एवढेच नाही तर मुली आणि पत्नीकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोपही अब्दुल रशीद यांनी केला आहे.

ठळक मुद्देजवाहरलाल नेहरू यूनिव्हर्सिटीची (जेएनयू) माजी विद्यार्थी नेता शेहला रशीद पुन्हा एकदा वादात अडकली आहे. खुद्द तिचे वडील अब्दुल रशीद शोरा यांनीच तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत.यासंदर्भात शेहला रशीदच्या वडिलांनी जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) पत्रही लिहिले आहे.

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू यूनिव्हर्सिटीची (जेएनयू) माजी विद्यार्थी नेता शेहला रशीद पुन्हा एकदा वादात अडकली आहे. यावेळी खुद्द तिचे वडील अब्दुल रशीद शोरा यांनीच तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शेहला देश विरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात शेहला रशीदच्या वडिलांनी जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) पत्रही लिहिले आहे. यात म्हणण्यात आले आहे, की त्यांची मुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सामील आहे. एवढेच नाही तर मुली आणि पत्नीकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

शेहला रशीदच्या वडिलांनी आरोप करत दावा केला आहे, की शेहलाला परदेशातून तीन कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. व्यापारी जहूर अमहद शाह वटालीने शेहलाला जेकेपीएम पार्टीत सामील होण्यासाठी 3 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, शेहला वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वीही ती अनेक वेळा वादात सापडली आहे.

वाद आणि शेहलाचे जुनेच नाते - कलम 370 - जम्मू काश्मीरचे कलम 370 हटवल्यावरूनही शेहला रशीद वादात सापडली आहे. शेहला रशीद मुळची जम्मू काश्मीरमधील आहे. तसेच जम्मू काश्मीरला लागू असलेले कलम 370 हटवल्यावरूनही अनेक वेळा तिने आपली प्रतिक्रिया दिला आहे. तिने कलम 370 हटवण्याला विरोध केला होता. 

राजद्रोहाचा खटला - शेहला रशीदने ऑगस्ट 2019मध्ये भारतीय जवानांवर अनेक आरोप केले होते. शेहलाने आरोप केला होता, की भारतीय जवान काश्मिरी नागरिकांवर अत्याचार करतात. यावरूनही शेहला वादात अडकली होती. मात्र, लष्कराने तिचे आरोप फेटाळून लावले होते. याशिवाय, दिल्ली पोलिसांनी शेहलाविरोधात राजद्रोहाचा खटलाही नोंदवला होता.

अटकेला विरोध - शेहला जवाहरलाल नेहरू विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्षही होती. फेब्रुवारी 2016मध्ये जेएनयूचा तत्कालीन विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि उमर खालिदविरोधात राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. तेव्हा अनेकांना अटकही करण्यात आली होती. याविरोधात निदर्शन करूनही शेहलाने वाद उत्पन्न केला होता. 

राजकारणात प्रवेश - शेहलाने राजकारणातही प्रवेश केला आहे. राजकारणात प्रवेश करताना शेहला सर्वप्रथम नॅशनल कॉन्फ्रन्ससोबत आली. यानंतर ती आयएएसची नोकरी सोडून राजकारणात आलेल्या शाह फैसल यांच्या पक्ष केपीएमध्ये सामील झाली. मात्र, आता शेहला राजकारणापासून दूर आहे आणि तिने निवडणुकीच्या राजकारणापासून संन्यास घेण्याची घोषणाही केली आहे.

भारत विरोधी वक्तव्ये  -शेहला रशीद अनेक वेळा भारत विरोधी वक्तव्ये करतानाही दिसून आली आहे. अपल्या भारतविरोधी वक्तव्यांमुळेही शेहला अनेक वेळा वादात सापली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसPoliticsराजकारण