JNU मध्ये BBC च्या डॉक्यूमेंट्रीवरून वाद, फिल्म पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाली दगडफेक, वीज पुरवठाही बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 11:12 PM2023-01-24T23:12:53+5:302023-01-24T23:20:24+5:30

JNUSU च्या वतीने, कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना बीबीसीची डॉक्यूमेंट्री दाखवण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, जेएनयू प्रशासनाने बीबीसीची डॉक्यूमेंट्री दाखवली जाणार नाही, हे जाहीर केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली होती.

Controversy over BBC documentary narendra modi in JNU, students watching the film were pelted with stones, electricity supply was also cut off | JNU मध्ये BBC च्या डॉक्यूमेंट्रीवरून वाद, फिल्म पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाली दगडफेक, वीज पुरवठाही बंद

JNU मध्ये BBC च्या डॉक्यूमेंट्रीवरून वाद, फिल्म पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाली दगडफेक, वीज पुरवठाही बंद

googlenewsNext

जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरून जबरदस्त गोंधळ सुरू झाला आहे. आपल्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना बीबीसीची डॉक्यूमेंट्री दाखवली जाईल, अशी घोषणा स्टूडेंट युनियनने केली आहे. मात्र, याच वेळी प्रशासनाने कॅम्पसमधील वीज पुरवठा बंद केला आहे आणि  सर्व विद्यार्थी हातात लाइट घेऊन याचा विरोध करत आहेत. याच वेळी डॉक्यूमेंट्री पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेकही झाल्याचे वृत्त आहे. दगड कुणी फेकले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यामुळे येथील तणाव वाढला आहे.

JNUSU च्या वतीने, कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना बीबीसीची डॉक्यूमेंट्री दाखवण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, जेएनयू प्रशासनाने बीबीसीची डॉक्यूमेंट्री दाखवली जाणार नाही, हे जाहीर केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली होती. यानंतर मंगळवारी याचाच एक भाग म्हणून ती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सांगण्यात येते, की अद्यापही काही विद्यार्थी आपल्या फोनवर बीबीसीची ही डॉक्यूमेंट्री बघत आहेत. मात्र, प्रशासनाने वीजपुरवठा खंडित केला आहे. तसे काही विद्यार्थ्यांवर दगडफेकही झाली आहे.

सध्या संपूर्ण देशात बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरून वाद होताना दिसत आहे. केंद्र सरकारकडून आधीच डॉक्यूमेंट्री बॅन करण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्रालयाने जोर देत म्हटले आहे की, बीबीसीकडून या डॉक्यूमेंट्रीच्या माध्यमाने प्रपोगंडा पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, काही लोक या बंदीकडे सेंसरशिपच्या दृष्टीने बघत आहेत. त्यांच्या मते, अशा पद्धतीने माध्यमांना कंट्रोल केले जात आहे. जेएनयूमध्ये याच तर्काच्या आधारे JNUSU ने बीबीसीची डॉक्यूमेंट्री दाखवण्यासंदर्भात भाष्य केले आहे. मात्र आता येथे मोठा वाद सुरू झाला आहे. दगडफेक झाल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली आहे.
 

Web Title: Controversy over BBC documentary narendra modi in JNU, students watching the film were pelted with stones, electricity supply was also cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.