डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:44 IST2025-07-29T18:43:14+5:302025-07-29T18:44:18+5:30

समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्याबद्दल मौलाना साजिद रशीदी यांनी वादग्रस्त विधान केले होते. 

Controversial statement about Dimple Yadav; Maulana Sajid Rashidi beaten up in news studio | डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

खासदार डिंपल यादव यांच्याबद्दल ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशीदी यांनी वादग्रस्त विधान केले होते. डिंपल यादव यांनी मशिदीत प्रवेश केला, त्यावेळी त्यांनी घातलेल्या कपड्यांबद्दल रशीदी बोलले होते. या विधानानंतर त्यांना एका न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नोएडामधील सेक्टर १२६ मध्ये असलेल्या एका खासगी वृत्तवाहिनीच्या स्टुडिओमध्ये ही घटना घडली. मौलाना साजिद रशीदी हे उभे होते. त्यावेळी काही समाजवादी पक्षाच्या पदाधिकारी त्यांच्याजवळ गेले. 

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बोलणं सुरू असतानाच पदाधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण करायला सुरूवात केली. अचानक झालेल्या या प्रकाराने वृत्तवाहिनीच्या स्टुडिओमध्ये गोंधळ उडाला.

मौलाना साजिद रशीदी मारहाण व्हिडीओ

 

मौलाना साजिद रशीदी यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. डिंपल यादव एका मशि‍दीमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी चेहरा न झाकता बसल्या होत्या. त्याबद्दल बोलताना मौलानांनी आक्षेपार्ह विधान केले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. 

Web Title: Controversial statement about Dimple Yadav; Maulana Sajid Rashidi beaten up in news studio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.