शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी सरकारवर संघाचे नियंत्रण

By admin | Updated: May 24, 2015 02:16 IST

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या वर्षाच्या कामगिरीवर महाराष्ट्र आणि गोव्यातील जनता फार असमाधानी नाही.

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या वर्षाच्या कामगिरीवर महाराष्ट्र आणि गोव्यातील जनता फार असमाधानी नाही. महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक प्रगतीचे मोठे परिणाम दिसत नसले तरी लोकांना या सरकारकडून असलेल्या अपेक्षा अजूनही कायम आहेत. ‘लोकमत समूह’ने केलेल्या दोन राज्यांतील सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे.अमिताभ श्रीवास्तव ल्ल मुंबईअनेक वेळा हो-नाही करीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नियंत्रण असल्याचे जाणवते. नागपूरच्या सततच्या दौऱ्यांमुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे फारसे लक्ष नाही. त्यामुळे लोक सरकारवर नाराज आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) सरकारला मंगळवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त ‘लोकमत’ समूहाने महाराष्ट्र आणि गोव्यात केलेल्या सर्वेक्षणातून या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. मोदी सरकारच्या कारकीर्दीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्रातील अनेक शहरांत आणि गोव्यात केलेल्या सर्वेक्षणात मोदी सरकारबाबत निवडणूक आणि त्यानंतरच्या परिस्थितीवरील लोकभावना अगदी स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. देशात महागाई कमी झालेली नाही, ‘अच्छे दिन’ अजूनही दूरच आहेत; पण लोकांची आशा अजूनही नष्ट झालेली नाही. गेल्या वर्षभरात मोदी सरकारची कामगिरी फार वाईट नसली, तरी चांगलीदेखील नसल्याचे लोकांना वाटते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तड लागत नाही, हे मोदी सरकारचे अपयशच मानले जात आहे. शेतकऱ्यांशी संबंधित आणि नुकतेच विरोधी पक्षांकडून टीकेचे धनी झालेल्या भूमी अधिग्रहण विधेयकाला लोक मोदी सरकारचे सगळ्यात मोठे अपयश मानतात. काळा पैसा देशात आणणे आणि भ्रष्टाचारापासून मुक्तता या आश्वासनांपेक्षाही जमीन अधिग्रहणासंदर्भातील सरकारचे अपयश फार मोठे समजले जाते.सरकारच्या अपयशाबद्दल लोकभावना संमिश्र असल्या तरी मोदी सरकारची लोकप्रियता मात्र कायम आहे. मोदी यांची सगळ्यात पहिली महत्त्वाकांक्षी मोहीम ‘स्वच्छता अभियान’ लोकांना खूप आवडली; परंतु सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असलेले नियंत्रण आणि संघाच्या आदेशाचे सरकारकडून होणारे पालन हेदेखील लोकांच्या नजरेतून सुटले नाही. दुसरीकडे मोदी सरकारचे झुकते माप स्पष्टपणे उद्योग-व्यापार क्षेत्राला असल्याचे दिसून येते. असे असले तरी उद्योग क्षेत्रातीलच एक गट सरकारवर टीकाही करतो आहे. सर्वेक्षणात सत्ताधारी खासदारांबद्दल लोकभावना चांगली नाही. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते योग्यरीत्या काम करीत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे; परंतु सोशल मीडियावर सरकारच्या वतीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची तारीफही होत आहे. हे सर्वेक्षण गेल्या आठवड्यात १३ ठिकाणी केले गेले. त्यात वेगवेगळ्या वयोगटांतील, व्यवसाय, उद्योगातील स्त्री-पुरुषांचा समावेश होता.