शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

औषधांच्या किमती नियंत्रणात आणा

By admin | Updated: March 17, 2016 03:34 IST

जास्तीत जास्त औषधे जीवनरक्षक श्रेणीत समाविष्ट करून त्यांच्या किमती नियंत्रणात आणण्यात याव्यात, अशी मागणी खासदार विजय दर्डा यांनी बुधवारी सरकारकडे केली.

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीजास्तीत जास्त औषधे जीवनरक्षक श्रेणीत समाविष्ट करून त्यांच्या किमती नियंत्रणात आणण्यात याव्यात, अशी मागणी खासदार विजय दर्डा यांनी बुधवारी सरकारकडे केली. राज्यसभेत लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना औषध निर्माते सरकारच्या मूल्य निर्धारण धोरणाचे पालन करीत नाहीत. परिणामी बाजाराचा ८० टक्के हिस्सा मूल्यनिर्धारण चौकटीच्या बाहेर आहे. या औषधांचा आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत समावेश नाही, असा थेट आरोप दर्डा यांनी केला. औषधांच्या आकाशाला भिडणाऱ्या किमतींवर गंभीर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, देशात गरिबांना औषधोपचार करणे जवळपास अशक्य झाले आहे. आजाराने त्रस्त एखाद्या गरीब व्यक्तीला औषधांसाठी एवढी मोठी किंमत अदा करणे किती कष्टदायी आहे याच्या केवळ विचारानेच हृदयाचा थरकाप उडतो. विजय दर्डा यांनी यासंदर्भातील वस्तुस्थिती सादर करताना सांगितले की, ४७०० औषधांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असल्याचे भारतीय औषध मूल्य नियंत्रकाच्या निदर्शनास आले आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा औषध मूल्य निर्धारण धोरण अव्यावहारिक आणि विसंगत असल्याचे म्हटले आहे. अनेक औषधांच्या किरकोळ मूल्यात ४,००० टक्क्यांपर्यंत तफावत असल्याचे गेल्या वर्षी एका प्रकरणात न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. असे आहे वास्तवपूर्वी २० अमेरिकन डॉलर्सला मिळणाऱ्या एचआयव्हीच्या औषधाची किंमत आता ७५० डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. त्याचप्रमाणे मधुमेह, हेपेटायटिससारख्या औषधांच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. देशात औषधांच्या मूल्य निर्धारणासाठी एक धोरण तयार करण्यात आले असून एनएलईएमअंतर्गत ३४८ औषधांना आवश्यक औषधांच्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे, हे सर्वश्रुत आहे. तरीही या व्यवस्थेचे पालन होत नसल्याचे दिसून येते.एवढेच नाहीतर प्राधिकरणही या यादीत समाविष्ट औषधांची कुठल्या किमतीने विक्री होत आहे याची आकडेवारी योग्य पद्धतीने गोळा करीत नसून ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकाराने गरीब जनता मात्र होरपळली जात असून आजारावर योग्य उपचार करण्यास घाबरत आहे, अशी खंत दर्डा यांनी व्यक्त केली.