शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी नोकर भरतीचा चेंडू सहकार खात्याच्या कोर्टात

By admin | Updated: August 22, 2016 23:47 IST

जिल्हा बॅँकेने मागविले मार्गदर्शन

जिल्हा बॅँकेने मागविले मार्गदर्शननाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची वादग्रस्त ठरलेली कंत्राटी नोकरभरती स्थगितीच्या आणि रद्द होण्याच्या हिंदोळ्यावर झुलत आहे. या भरतीबाबत नेमके काय करावे? याबाबतचे मार्गदर्शन आता जिल्हा बॅँकेच्या विभागीय सह निबंधक कार्यालयाकडे मागविल्याचे वृत्त आहे.शनिवारी (दि.२०) झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकांनी ही कंत्राटी नोकरभरती रद्द करण्याबाबत चर्चा करणार असल्याचे बैठकीआधीच प्रसारमाध्यमातून जाहीर केले होते. त्यामुळेच की काय? या कंत्राटी कर्मचार्‍यांनी थेट कामगार न्यायालयात या कंत्राटी नोकरभरतीस रद्द करू नये, म्हणून अर्ज केला. त्यानुसार कामगार न्यायालयाने ही भरतीप्रक्रिया रद्द करू नये, म्हणून जिल्हा बॅँकेला आदेश दिल्याचे पत्र या कंत्राटी कर्मचार्‍यांनी बॅँकेकडे दिले होते. त्या पत्रावरच संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. त्यातच विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी ही कंत्राटी नोकरभरती नियमानुसार नसल्याने ३० ऑगस्टपर्यंत रद्द करण्याचे आदेश जिल्हा बॅँकेला दिले आहेत. सोमवारी जिल्हा बॅँकेच्या काही अधिकार्‍यांनी विभागीय सहनिबंधक कार्यालय गाठून त्यांच्याकडे ही कंत्राटी नोकरभरती कशी व कोणत्या नियमाखाली रद्द करावी? याबाबत मार्गदर्शन मागविल्याचे कळते. जिल्हा बॅँकेच्या अधिकार्‍यांनी कंत्राटी कर्मचार्‍यांनी कामगार न्यायालयात याबाबत दाखल केलेली याचिका व त्याबाबतचे आदेशही सहकार विभागाला सादर केले. याबाबत सहकार विभागाने काय कार्यवाही करायची त्याबाबत लवकरच जिल्हा बॅँकेला कळविण्यात येईल, असे सांगितल्याचे समजते. त्यामुळे कंत्राटी नोकरभरतीचा चेंडू आता सहकार विभागाच्या कोर्टात असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)