शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

"विरोधकांना लाल डोळे दाखवण्याऐवजी देशाच्या शत्रुला दाखवा"; काँग्रेसचा मोदी सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 08:41 IST

Congress Slams BJP on issue of china : चीनला दिलेली क्लीन चिट पंतप्रधान मोदी मागे घेतील आणि काहीतरी बोलतील, अशी अपेक्षा व्यक्त करत काँग्रेसने सणसणीत टोला लगावला आहे.

नवी दिल्ली - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीमध्ये झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारमण, एस जयशंकर, अनुराग ठाकूर, योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसने देखील पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चीनसंबंधी आपले धोरण देशासमोर मांडावं, असं काँग्रेसने म्हटलं. "विरोधकांना लाल डोळे दाखवण्याऐवजी देशाच्या शत्रुला दाखवा" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

चीनला दिलेली क्लीन चिट पंतप्रधान मोदी मागे घेतील आणि काहीतरी बोलतील, अशी अपेक्षा व्यक्त करत काँग्रेसने सणसणीत टोला लगावला आहे. काँग्रेसने आपल्या पत्रकार परिषदेमध्ये चीनने अरुणाचल प्रदेशात भारताच्या सीमेच्या आत साडेचार किमी आतमध्ये एक गाव वसवले आहे, अमेरिकेच्या पेंटागॉनने हा रिपोर्ट दिला आहे. चिनी सैन्य सीमा भागात रस्त्यांचं जाळं विणत आहे. तसंच वास्तू आणि ऑप्टिकल फायबर केबलचे नेटवर्क उभारत आहे. यामुळे चीनला दिलेली क्लीन चिट पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे घेतील आणि चीनवर बोलतील, असं म्हटलं आहे. 

"चीनच्या सततच्या कुरापतींवर भारत गप्प"

चीनच्या मुद्द्यावर बोलणं गरजेचं आहे. कारण सामरिक आणि दृष्ट्या हा भाग महत्त्वाचा आहे. चीनच्या या कुरापतींमुळे सिलिगडुी कोरिडोर धोक्यात आला आहे.  गेल्या 18 महिन्यांत चीनने वेगवगेळ्या प्रकारे घुसखोरी केली आहे. गेल्या महिन्यात चीनने पूल तोडला होता, असं देखील काँग्रेस म्हणाली. चीनच्या सततच्या कुरापतींवर भारत गप्प आहे. चीन भूतानशी चर्चा करतोय आणि भारत सरकार गप्प आहे. चीन श्रीलंकेत बंदर काबिज करतो आणि मालदीवमध्ये द्वीप घेतो, तरीही भारत सरकार गप्प आहे. 

"चीनला दिलेल्या क्लीन चिटने भारताचे मोठे नुकसान" 

चीन ग्वादर बंदल बळकावतो, तरीही भारत गप्प आहे. इतकं सगळं होऊनही भारत सरकार गप्प का आहे? चीनला दिलेली क्लीन चिट भारत मागे का घेत नाही? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. चीनला दिलेल्या क्लीन चिटने भारताचे मोठे नुकसान झाले आहे. चीनसोबतचा व्यापार 67 टक्क्यांनी वाढला आहे. देशाच्या शत्रूला लाल डोळे दाखवण्याऐवजी विरोधी आणि पत्रकारांना दाखवले जात आहे, असा टोला काँग्रेसने मोदी सरकारला लगावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :chinaचीनBJPभाजपाcongressकाँग्रेसIndiaभारत