Congress state president, Ranekanna ban for campaign for 72 hours | काँग्रेस नेते रायकेंना ७२ तासांसाठी प्रचारावर बंदी
काँग्रेस नेते रायकेंना ७२ तासांसाठी प्रचारावर बंदी

गुजरात - निवडणूक आयोगाने गुजरातचे काँग्रेस नेते बाबूभाई रायक यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ७२ तासांसाठी प्रचारावर बंदीची कारवाई केली आहे. गुरुवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून रायक यांच्या प्रचारावर प्रतिबंध लागू होणार आहे. एका सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी खालच्या पातळीवर भाषण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

११ एप्रिल रोजी पक्षाच्या कार्यकर्त्यांना व मतदारांना संबोधित करताना, बाबुभाई रायका यांनी असभ्य आणि अपमानजनक भाषा वापरली होती. त्यांच्या विधानाचा निवडणूक आयोगाकडून  निषेध करण्यात आला असून, भारतात कुठेच रायका यांना ७२ तासासाठी प्रचार सभा घेता येणार नसल्याचा, आदेश  निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे.

गुजरातचे काँग्रेस नेते  बाबुभाई रायका यांना ५ मे रोजीपर्यंत प्रचार बंदी लागू रहाणार आहे. गुजरातमध्ये २३ मे रोजी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता रायका यांच्या प्रचार बंदीमुळे कॉंग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. गुजरातमध्ये भाजप  हा शक्तिशाली पक्ष समजला जातो. गुजरात मधील लढतीत काँग्रेस संपूर्ण ताकदीचा  वापर करत आहे. मात्र अशातच गुजरात मधील कॉंग्रेस पक्षातील महत्वाच्या नेत्यावर  प्रचार बंदीची कारवाई झाल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

एकीकडे गुजरातमध्ये काँग्रेस नेते बाबुभाई रायका यांच्यावर प्रचार बंदीची कारवाई करण्यात आली आहे तर दुसरीकडे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भोपाळच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर सुद्धा निवडणूक आयोगाने 72 तासांसाठी प्रचारावर बंदी घातली आहे. याआधी सुद्धा निवडणूक आयोगाने कॉंग्रसचे नेते नवजोत सिंह सिद्धू आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रचार बंदीची कारवाई केली होती.


 


Web Title: Congress state president, Ranekanna ban for campaign for 72 hours
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.