गुजरात निवडणुकीत अपक्ष उमेदवारांपेक्षा कमी जागा!; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

By देवेश फडके | Published: March 3, 2021 10:48 AM2021-03-03T10:48:51+5:302021-03-03T10:50:55+5:30

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) सर्वच्या सर्व ३१ जागांवर दणदणीत विजय मिळवत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. यांपैकी २९ जिल्हा परिषदा तर अशा होत्या, जेथे काँग्रेसच्या (Congress) विजयी उमेदवारांची संख्या दुहेरी आकडाही गाठू शकली नाही. या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे.

congress state president give resign after gujarat local body election results | गुजरात निवडणुकीत अपक्ष उमेदवारांपेक्षा कमी जागा!; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

गुजरात निवडणुकीत अपक्ष उमेदवारांपेक्षा कमी जागा!; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

Next
ठळक मुद्देगुजरात निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मोठा पराभवपराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामाकाँग्रेसपेक्षा अपक्षांना जास्त जागा मिळाल्याचा भाजपचा टोला

अहमदाबाद :गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) सर्वच्या सर्व ३१ जागांवर दणदणीत विजय मिळवत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. यांपैकी २९ जिल्हा परिषदा तर अशा होत्या, जेथे काँग्रेसच्या (Congress) विजयी उमेदवारांची संख्या दुहेरी आकडाही गाठू शकली नाही. या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. (congress state president give resign after gujarat local body election results)

गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला असून, ३१ जिल्हा परिषदा, ८१ पैकी ७५ नगरपालिका, २३१ पैकी २०० तालुका पंचायतींमध्ये भाजपने निर्विवाद विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अपक्षांपेक्षाही काँग्रेसला कमी जागा मिळाला असल्याचा दावा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केला आहे. 

अधीर रंजन चौधरी यांच्यासाठी भाजपचे दरवाजे नेहमी खुले, कधीही यावे: दिलीप घोष 

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा 

गुजरातमधील निवडणुकांच्या निकालानंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित चावडा आणि विरोधी पक्षनेते परेश धनानी यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. भाजपची विजयी परंपरा कायम राहिली असून, काँग्रेस आमदारांचे अनेक पुत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. 

भाजपचा मोठा विजय

गुजरातमधील ४७७४ तालुका पंचायतीच्या जागांपैकी भाजपने तब्बल ३३५१ जागांवर विजय मिळवला असून, काँग्रेसला केवळ १२५२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यातच ओवेसींच्या एआयएमआयएम पक्षाने गोध्रा येथे ८ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यांपैकी ७ उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसचा यापूर्वीही नगरपालिका निवडणुकीत वाईट प्रकारे पराभव झाला होता.

दरम्यान, गुजरातच्या ग्रामीण भागाने सर्वसंमतीने विकासावर शिक्कामोर्तब केले आहे. सरकारच्या जनहितार्थ कामाने लोकांच्या मनात घर केले आहे. तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. आमचा पक्ष गुजरातमधील सर्व बंधू-भगिनींच्या प्रगतीसाठी काम करत राहील. गुजरातमधील नगरपालिका, तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निकालाने आपला स्पष्ट संदेश दिला आहे. संपूर्ण राज्य विकास, सुशासन आणि जनकल्याणाच्या अजेंड्यासोबत मजबुतीने उभे आहे. भाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल गुजरातच्या जनतेला नमन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे.  

Web Title: congress state president give resign after gujarat local body election results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.