bjp leader dilip ghosh says we welcomes congress leader adhir ranjan choudhary | अधीर रंजन चौधरी यांच्यासाठी भाजपचे दरवाजे नेहमी खुले, कधीही यावे: दिलीप घोष 

अधीर रंजन चौधरी यांच्यासाठी भाजपचे दरवाजे नेहमी खुले, कधीही यावे: दिलीप घोष 

ठळक मुद्देअधीर रंजन चौधरी यांना भाजपकडून खुली ऑफरअधीर रंजन चौधरी यांचा काँग्रेसमध्ये अनादर - भाजपचा दावापश्चिम बंगालमधील राजकीय रणधुमाळी अधिक तीव्र होण्याची चिन्हे

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकारण अधिक तापताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी, नेते, आमदार, मंत्री यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. अशातच आता लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी (adhir ranjan choudhary) यांना भाजपकडून खुली ऑफर देण्यात आली आहे. काँग्रेसकडून अधीर रंजन चौधरी यांचा योग्य सन्मान होत नाही, त्यांचे भाजपमध्ये स्वागत आहे, असे पश्चिम बंगालमधील भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे. (bjp leader dilip ghosh says we welcomes congress leader adhir ranjan choudhary)

भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी अधीर रंजन चौधरी यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस पक्षात अधीर रंजन चौधरी यांचा योग्य सन्मान केला जात नाही. अधीर रंजन चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी थेट ऑफर दिलीप घोष यांच्याकडून देण्यात आली आहे. 

सौरव गांगुली PM मोदींच्या रॅलीतून राजकीय इनिंग सुरू करणार?; भाजपने केले स्पष्ट

अधीर रंजन चौधरी यांचे भाजपमध्ये स्वागत

अधीर रंजन हे काँग्रेसमधील बडे नेते आहेत. अशा बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये योग्य सन्मान केला जात नाही. ही चांगले नाही. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अधीर रंजन चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच आहे. अधीर बाबू आमचे जुने-जाणते नेते आहेत. राजकारणातील ते वरिष्ठ व्यक्ती आहेत. काँग्रेस त्यांना अपमानित करत आहे, तसेच त्यांचा अनादर केला जात आहे. भाजपचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमीच खुले आहेत. त्यांनी कधीही यावे, असे दिलीप घोष यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांशी युती केली असून, त्यात आता मुस्लीम धर्मगुरू अब्बास सिद्दीकी यांचा इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) हा पक्षही सहभागी झाला आहे. प्रक्षोभक विधाने करून सिद्दीकी अनेकदा वादात सापडले आहेत. ‘जी-२३’ गटातील नेते आनंद शर्मा यांनी हाच मुद्दा उपस्थित करून काँग्रेसच्या ‘आयएसएफ’ला सहभागी करून घेण्यावर आक्षेप घेतला. त्यावरून काँग्रेसमध्ये गांधी निष्ठावान आणि बंडखोर नेत्यांमध्ये वाद सुरू आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bjp leader dilip ghosh says we welcomes congress leader adhir ranjan choudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.