"भाजपाने संविधानाची सर्कस केली, लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 03:50 PM2020-07-24T15:50:15+5:302020-07-24T16:33:35+5:30

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

congress randeep surjewala slams bjp over rajasthan political crisis | "भाजपाने संविधानाची सर्कस केली, लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं"

"भाजपाने संविधानाची सर्कस केली, लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं"

Next

नवी दिल्ली - राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसने मोठा निर्णय घेतला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाने संविधानाची सर्कस केली असं म्हणत सुरजेवाला यांनी हल्लाबोल केला आहे.

'भाजपाने संविधानाची सर्कस केली. त्यांनी लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं आहे' असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रणदीप सुरजेवाला यांनी शुक्रवारी (24 जुलै) ट्विट केलं आहे. "भाजपाने संविधानाची सर्कस केली आहे. त्यांनी लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण करणाऱ्या कौरवांचं जे झालं होतं तेच राजस्थानची कृष्णरूपी जनता भाजपाच्या कटाचं करेल. आता न्याय मिळेल" असं ट्विटमध्ये आहे. तसेच Rajasthan हा हॅशटॅग वापरला आहे. 

सुरजेवाला यांनी दिल्लीत सत्तेवर बसलेल्यांना विधिमंडळात बहुमताची भीती का वाटत आहे? असा सवाल देखील विचारला आहे. "जेव्हा काँग्रेसकडे बहुमत आहे, सभागृहदेखील भरवायचं आहे. तसेच हा अधिकार सरकारचा आहे तेव्हा भाजपावाले आणि त्यांचे अनुयायी पाठ दाखवून का पळून जात आहेत. दिल्लीत सत्तेवर बसलेल्यांना विधिमंडळात बहुमताची भीती का वाटत आहे?" असं देखील सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. 

"देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न", राहुल गांधीचा घणाघात

काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न असल्याचं म्हटलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ची प्रतिमा तयार करण्यावर 100 टक्के लक्ष केंद्रीत केले आहे. भारतातील सर्व संस्था तेच काम करण्यामध्ये व्यस्त आहेत. एका माणसाची प्रतिमा राष्ट्रीय दृष्टीकोनाला पर्याय असू शकत नाही" असं म्हणत राहुल यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. "मजबूत स्थितीमध्ये राहून चीनशी चर्चा करत असाल, तरच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करु शकता. चीनने जर तुमचा कमकुवतपणा पकडला, तर अडचण आहे. चीनचा विषय हाताळण्यासाठी तुमच्याकडे दृष्टीकोन असला पाहिजे. भारताला जागतिक दृष्टीकोनाची गरज आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भारीच! TikTok युजर्सना आकर्षित करण्यासाठी Rizzleने आणला 'हा' भन्नाट प्रोग्राम, क्रिएटर्सना मिळणार अनोखी संधी

CoronaVirus News : अरे व्वा! देशातील वयोवृद्ध दाम्पत्याने जिंकली कोरोनाची लढाई, तब्बल 25 दिवसांनी केली मात

मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; Helo Lite सहीत 'या' अ‍ॅप्सवर घालणार बंदी 

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! फक्त तीन दिवसांत देशात 1 लाख नवे रुग्ण; धडकी भरवणारा ग्राफ

CoronaVirus News : कोरोना संकटातील भयानक वास्तव! 50 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार, सरकारने दिलं 'हे' कारण

CoronaVirus News : बापरे! ताज्या हवेसाठी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्ताला ICUतून बाहेर आणलं अन्...

CoronaVirus News : धक्कादायक! उपचारासाठी तीन रुग्णालयांनी दिला नकार, कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू

Web Title: congress randeep surjewala slams bjp over rajasthan political crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.