शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा सुरू होणार सरकार पाडण्याचा खेळ, गेहलोतांचा खळबळजनक दावा; भाजप, पायलटांवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 17:34 IST

गेहलोत म्हणाले, काँग्रेस नेते अजय माकन, हे यापूर्वी भाजपकडून झालेल्या सरकार पाडण्याच्या प्रयत्नांचे साक्षिदार राहिले आहेत. या घटनेदरम्यान माकन 34 दिवस हॉटेलमध्ये आपल्या आमदारांसोबत राहिले होते. 

ठळक मुद्देराजस्थानात मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघायला सुरुवात झाली आहे.पुन्हा एकदा राजस्थानातील सरकार पाडण्याचा खेळ सुरू होणार आहे - गेहलोतभाजपच्या आडून माजी उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर निशाणा.

जयपूर - राजस्थानात मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी आरोप केला आहे, की पुन्हा एकदा राजस्थानातील सरकार पाडण्याचा खेळ सुरू होणार आहे. ते काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

गेहलोत म्हणाले, काँग्रेस नेते अजय माकन, हे यापूर्वी भाजपकडून झालेल्या सरकार पाडण्याच्या प्रयत्नांचे साक्षिदार राहिले आहेत. या घटनेदरम्यान माकन 34 दिवस हॉटेलमध्ये आपल्या आमदारांसोबत राहिले होते. 

पाच सरकारे पाडली आहेत, सहावेही पाडणार आहोत -अशोक गेहलोत यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप केला, की आपल्या आमदारांना बसवून चहा पाजत होते आणि सांगत होते, की पाच सरकारे पाडली आहेत. सहावेही पाडणार आहोत. धर्मेंद्र प्रधान हे त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी न्यायाधिशांसी चर्चा करण्यासंदर्भात बोलत होते. एवढेच नाही, तर शाह यांनी आमच्या आमदारांशी तब्बल एक तास चर्चा केली, असेही गेहलोत यांनी म्हटले आहे. तसेच पाच सरकारे पाडल्यानंतर आता सहावीही पाडणार असल्याचे शाह यांनी म्हटले होते. 

तेव्हा कुठे सरकार वाचले -गेहलोत म्हणाले, या घटनेदरम्यान काँग्रेस नेते अजय माकन, रणदीप सुरजेवाला, अविनाश पांडे येथे येऊन बसले आणि त्यांनी नेत्यांना बर्खास्त करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुठे सरकार वाचले. राजस्थानच्या सर्व जनतेला वाटत होते, की सरकार पडू नये. राज्यातील लोक सरकार पडू देऊ नका, असे फोन काँग्रेस आमदारांना करत होते. 

भाजपच्या आडून माजी उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर निशाणा - असेही म्हटले जात आहे, की मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपच्या आडून माजी उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राजस्थानात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचेही बोलले जात आहे. यामुळेच नाव न घेता सचिन पायलट यांच्यावर निशाणा साधल्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे. 

 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटBJPभाजपाcongressकाँग्रेसAmit Shahअमित शहा