शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन जग थक्क; मोदी सरकारचं प्रतीमा, ब्रँड बनवण्यावर लक्ष : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 11:41 AM

Coronavirus In India : सरकार सुरूवातीपासून कोरोनाचा सामना करण्यास आणि समजण्यास असमर्थ ठरल्याचे राहुल गांधी यांचं वक्तव्य

ठळक मुद्देसरकार सुरूवातीपासून कोरोनाचा सामना करण्यास आणि समजण्यास असमर्थ ठरल्याचे राहुल गांधी यांचं वक्तव्ययापूर्वी श्रेय घेतलं आता चेंडू राज्यांकडे टोलवला : राहुल गांधी

देशात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत देशात दररोज साडेतीन-चार लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद होताना दिसत आहे. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसंच यामुळे सपूर्ण जग चिंतीत झालं असल्याचं त्यांनी म्हटलं. "ज्यावेळी देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसत होता त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले ही लढाई जिंकण्याचं श्रेय घेतलं. आता त्यांनी तो चेंडू राज्यांकडे टोलवला," असा आरोप त्यांनी यावेळी केला. "आत्मनिर्भर बनवण्याचा उद्देश आहे. तुमच्या मदतीसाठी कोणीही येणार नाही. पंतप्रधानही येणार नाहीत. सरकारसाठी कोरोनाची स्थिती ही पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे आणि आश्चर्य व्यक्त केलं जात आहे की राज्य आणि नागरिकाना आत्मनिर्भर करण्याची त्यांची ही पद्धत आहे," असं राहुल गांधी म्हणाले. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार असमर्थ ठरलं. वैज्ञानिकांनी वेळोवेळी इशाराही दिला होता. भारत हा जगातील पहिला असा देश आहे जो तज्ज्ञांनी कोरोना विषाणूसोबत लढण्याच्या दिलेल्या सल्ल्याशिवाय या महासाथीचा सामना करत आहे. तज्ज्ञ किंवा विशेषाधिकार असलेल्या संस्थांना विषाणूचा सामना करणं आणि गरजांनुसार निर्णय घेण्याचा अधिकार, योजना तयार करण्याचा अधिकार असतो. जेणेकरून लोकांचं जिवन वाचवण्यासाठी त्वरित पावलं उचलायला हवी," असंही ते म्हणाले.निवडणुकीत व्यस्त"ते कायमच निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होता. त्यांनी विषाणूचा प्रादुर्भाव वाढवणाऱ्या कार्यक्रमांना प्रोत्साहन दिलं. गेल्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्री सार्वजनिक ठिकाणीही विना मास्क दिसले होते. ते कोणत्या प्रकारचा संदेश देत आहेत?," असंही राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी लसींच्या किंमतीवरूनही पंतप्रधानांवर आरोप केला. उत्पादकांनी पहिले किंमत निश्चित केली आणि त्यानंतर ती कमी केली. एक प्रकारचा शो बवला आहे. सद्यस्थितीसाठी पंतप्रधान जबाबदार आहेत. ते व्यक्तीगत सरकारी व्यवस्था चालवतात. त्यांचं संपूर्ण लक्ष ब्रँडिंगवर आणि केवळ प्रतीमा चमकावण्यावर असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा