"आपली एक इंच भूमीही..."; भाजपनं शेअर केला नरवणे यांचा व्हिडिओ, राहुल गांधींवर थेट निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 21:55 IST2026-02-02T21:54:09+5:302026-02-02T21:55:15+5:30
दरम्यान, भाजपने आता नरवणे यांचा एक जुना व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, त्यात "आपण आपली एक इंचही जमीन गमावलेली नाही', असे नरवणे यांनी म्हटले आहे. भाजपने राहुल गांधींवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला.

"आपली एक इंच भूमीही..."; भाजपनं शेअर केला नरवणे यांचा व्हिडिओ, राहुल गांधींवर थेट निशाणा
सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना डोकलामचा मुद्दा उपस्थित सरकारवर थेट हल्ला चढवला. यामुळे सभागृहात एकच गदारोळ सुरू झाला. यामुळे सभागृहाचे कामकाज आधी दुपारी ४ वाजेपर्यंत आणि नंतर दुसऱ्या दिवसापर्यंत स्थगित करावे लागली. राहुल गांधी यांनी, माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकाचा हवाला देत सरकारवर निशाणा साधला होता.
दरम्यान, भाजपने आता नरवणे यांचा एक जुना व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, त्यात "आपण आपली एक इंचही जमीन गमावलेली नाही', असे नरवणे यांनी म्हटले आहे. भाजपने राहुल गांधींवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला.
व्हिडिओमध्ये नेमकं काय? -
भाजपने शेअर केलेल्या नरवणे यांच्या एक जुन्या व्हिडिओमध्ये, एएनआयशी बोलताना, "सर्वप्रथम, मी आपल्याला सांगू इच्छितो की, आपण आपली एक इंचही जमीन गमावलेली नाही. आपण अजूनही पूर्वी जेथे होतो, तेथेच आहोत," असे नरवणे यांनी म्हटले आहे. यानंतर, त्यांनी चीनसोबत सुरू असलेल्या विच्छेदन प्रक्रियेचा उल्लेख केला आहे.
𝐒𝐡𝐚𝐦𝐞𝐟𝐮𝐥 𝐩𝐨𝐥𝐢𝐭𝐢𝐜𝐬 𝐛𝐲 𝐑𝐚𝐡𝐮𝐥 𝐆𝐚𝐧𝐝𝐡𝐢! ❌
— BJP (@BJP4India) February 2, 2026
Former Army Chief General M. M. Naravane has stated clearly:
“𝐍𝐨𝐭 𝐚𝐧 𝐢𝐧𝐜𝐡 𝐨𝐟 𝐥𝐚𝐧𝐝 𝐡𝐚𝐬 𝐛𝐞𝐞𝐧 𝐥𝐨𝐬𝐭. 𝐖𝐞 𝐚𝐫𝐞 𝐞𝐱𝐚𝐜𝐭𝐥𝐲 𝐰𝐡𝐞𝐫𝐞 𝐰𝐞 𝐰𝐞𝐫𝐞 𝐛𝐞𝐟𝐨𝐫𝐞.”
Yet, to push his… pic.twitter.com/s5aMZEvApB
काय म्हणाले होते राहूल गांधी?
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान खासदार राहुल गांधी म्हणाले, "भारत-चीन सीमेवर जे घडले, ते लष्करातील प्रत्येक जवानाला माहीत आहे. मात्र, मोदी सरकार हे जनतेपासून लपवत आहे." यावेळी त्यांनी जनरल नरवणे यांच्या 'Four Stars of Destiny' या पुस्तकाचा उल्लेख केला.
गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा तीव्र आक्षेप -
यावर, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. अमित शाह म्हणाले, "संरक्षण मंत्री फक्त एवढेच विचारत होते की, ते ज्या नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला देत आहेत, ते पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही? यावर, "सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका आणि अनावश्यक भाष्यही करू नका", असे राजनाथ सिंह म्हणाले. यानंतर, गदारोळ वाढल्यानंतर संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले.