शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

"कोरोनाच्या काळात मोदी सरकारचा 'खयाली पुलाव', संकटातील 'संधी'", राहुल गांधींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 12:01 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 50 लाखांचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 50,20,360 वर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,123 नवे रुग्ण आढळले असून 1,290 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 82,066  लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने खयाली पुलाव केले असं म्हणत राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने खयाली पुलाव केले. 21 दिवसांमध्ये कोरोनावर मात करू, आरोग्य सेतू अ‍ॅपमुळे संरक्षण होईल, 20 लाख कोटींचे पॅकेज, आत्मनिर्भर व्हा, सीमेवर कोणीही घुसखोरी केली नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र संकटातील संधी हे एक सत्य होतं" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल यांनी याआधीही देशात कोरोनाच्या वाढत्या प्रसारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. 

"कोरोनामध्ये आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा जीव स्वतःच वाचवा कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत"

"अनियोजित लॉकडाऊन ही एका अहंकारी व्यक्तीची देण आहे. ज्यामुळे कोरोना देशभरात पसरला. आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा जीव स्वतःच वाचवा, कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत" असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. "कोरोनाची रुग्णसंख्या या आठवड्यात 50 लाख आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 10 लाखांच्या पुढे जाईल. अनियोजित लॉकडाऊन एका व्यक्तीच्या अहंकाराची देण आहे, ज्यामुळे कोरोना देशभर पसरला. मोदी सरकारने आत्मनिर्भर व्हा असं सांगितलं आहे. म्हणजेच स्वतःचा जीव स्वतःच वाचवा, कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

"मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं", राहुल गांधींचा घणाघात

काही दिवसांपूर्वी "मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं" असं म्हणत राहुल गांधींनी जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. राहुल गांधी यांनी काँग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या स्पिक अप मोहिमेत ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशातील करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्याचं म्हटलं. "अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाऊन असंघटीत क्षेत्रासाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला. 21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन दिलं होतं पण कोट्यवधी रोजगार आणि छोटे उद्योग संपवण्यात आले" असं ही राहुल यांनी म्हटलं होतं. 

"21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन होतं पण कोट्यवधी रोजगार, छोटे उद्योग संपवण्यात आले"

"कोरोनाच्या नावावर जे केलं, ते असंघटीत क्षेत्रावरील तिसरं आक्रमण होतं. छोट्या आणि मध्यम उद्योग चालवणारे लोक रोज कमवतात आणि खातात. जेव्हा कोणतीही सूचना न देता लॉकडाऊन केलं तेव्हा ते यांच्यावरील आक्रमण होतं.पंतप्रधानांनी  21 दिवसांची लढाई असेल असं सांगितलं होतं पण असंघटीत क्षेत्राचा 21 दिवसांत कणाच तुटला. लॉकडाऊननंतर तो उठवण्याची वेळ आली. या काळात काँग्रेसने एक नाही, तर अनेक वेळा सांगितलं की, गरिबांची मदत करावीच लागेल. न्याय योजनेसारखी एक योजना लागू करावी लागेल. थेट बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील. पण तसं नाही केलं."

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : भय इथले संपत नाही! कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा लागण, रिसर्चमधून धोक्याचा इशारा

CoronaVirus News : 1 ऑक्टोबरपासून देशभरात चित्रपटगृह सुरू होणार?, जाणून घ्या 'त्या' मागचं सत्य

"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"

CoronaVirus News : बापरे! कोरोना लसींच्या चाचण्यांची माहिती लपवताहेत कंपन्या, शास्त्रज्ञांनी केलं अलर्ट

Apple Event 2020 : बहुप्रतिक्षित iPhone 12 लाँच न झाल्याने 'नाराजी'चा सूर, ट्विटरवर आला भन्नाट रिअ‍ॅक्शनचा पूर

Apple Event 2020 : अवघ्या 15 सेकंदांत रक्तातील ऑक्सिजन मोजणार, दमदार फीचर्ससह Apple Watch 6 लाँच

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत