शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

टेम्पल रननंतर आता राहुल गांधींना आठवली अमेठीतील मंदिरं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 14:36 IST

अमेठीतील मंदिरांवर राहुल गांधी प्रसन्न; निधीसाठी उघडला खजिना

अमेठी: नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसनं मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात भाजपाचा पराभव केला. या राज्यांमध्ये प्रचार करताना राहुल गांधींची 'टेम्पल रन' चर्चेत होती. काँग्रेसच्या विजयात राहुल गांधींच्यामंदिर भेटींचा मोठा वाटा होता. त्यामुळेच भाजपाच्या हिंदुत्वाच्या प्रयोगशाळेत काँग्रेसनं विजय खेचून आणला. या तीन राज्यांमध्ये टेम्पल रनचा चांगला परिणाम पाहायला मिळाल्यानंतर आता राहुल यांनी अमेठीतील मंदिरांकडे लक्ष वळवलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधींनी त्यांच्या मतदारसंघातील मंदिरांकडे विशेष लक्ष दिलं आहे. मतदारसंघातील अनेक मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सध्या राहुल यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी या मंदिराना निधीची कमतरता जाणवू नये, यासाठी ते कामाला लागले आहेत. राहुल गांधींच्या या निर्णयाचं भाजपानं स्वागत केलं आहे. मात्र राहुल यांची नियत चांगली नसल्याची टीकादेखील केली आहे. राहुल गांधींनी अमेठीतील अनेक मंदिरांना किर्तनासाठी आवश्यक हार्मोनियम, ढोलकी, टाळ आणि चिपळ्या अशी संगीतवाद्यं देण्याचा निर्णय घेतला आहे. तर गौरीगंजमधील दुर्गा मंदिरात सौरदिव्यांची व्यवस्था केली आहे. याशिवाय त्यांनी एका सामाजिक केंद्राच्या उभारणीसाठी सप्टेंबरमध्येच निधी मंजूर केला आहे. संग्रामपूरमधील कालिका देवी मंदिरातील प्रकाश व्यवस्थेसाठीदेखील निधी दिला आहे. राहुल यांच्या या निर्णयांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपा आणि संघ राहुल यांच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करतात. राहुल यांनी त्यांच्या कृतीतून अनेकांना उत्तर दिल्याची चर्चा सध्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशHinduहिंदूTempleमंदिरBJPभाजपा