शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

केंद्र सरकारला घेरण्याची काँग्रेस पक्षाची तयारी, विरोधी पक्षांशी बोलून रणनीती ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 3:26 AM

काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे होते की, चॅटसमधून खुलासा झाला की, ‘सीसीएस’ च्या सदस्यांकडून देशाचे सर्वोच्च संरक्षण भेद लीक झाले. असे होणे देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी घातक आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेस देशाच्या सुरक्षेवरून मोदी सरकारला संसदेच्या आगामी अधिवेशनात घेरण्याची तयारी करीत आहेत. याचे संकेत बुधवारी पक्षाचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी, सुशीलकुमार शिंदे, सलमान खुर्शीद हे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉटसॲपवरून झालेल्या खुलाशावरून बोलत असताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी दिले.आझाद आणि शिंदे म्हणाले की, अधिवेशन सुरू झाल्यावर विरोधी नेत्यांशी चर्चा करून काँग्रेस रणनीती ठरवेल. लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि पंतप्रधान मोदी यांना होती. बालाकोटमधील हवाई हल्ल्याच्या तीन दिवस आधी गोपनीय माहिती अर्णब गोस्वामी यांना कोणीतरी एकाने दिली. गोपनीय कायद्यानुसार ही गंभीर बाब आहे. राजद्रोहासारखाच हा गुन्हा आहे, असा युक्तिवाद करून संबंधित मंत्र्यांना काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे होते की, चॅटसमधून खुलासा झाला की, ‘सीसीएस’ च्या सदस्यांकडून देशाचे सर्वोच्च संरक्षण भेद लीक झाले. असे होणे देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी घातक आहे. ओएसए आणि गोपनीयतेच्या संवैधानिक शपथेचे उल्लंघन करणारे मंत्री तथा अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांना तत्काळ बरखास्त केले जावे. गोस्वामी-व्हाॅट्सॲप्प चॅट प्रकरणाने पंतप्रधान, गृहमंत्री आणि उच्च पदांवर बसलेल्या लोकांनी देशाच्या सुरक्षेबाबत केलेला अक्षम्य अपराध व संविधानच्या शपथेशी तडजोड करून भेसूर चेहरा दाखविला आहे. 

शेतकरी आंदोलन मध्यमवर्गावरही परिणाम करणारे असेल- राहुल गांधी -

- आंदोलन हे फक्त शेतकऱ्यांचे आहे, असे समजणे चूक आहे. नव्या तीन कृषी कायद्यांचा परिणाम किमान आधारभूत भाव (एमएसपी) नष्ट होऊन धान्याचे भाव भडकतील, तेव्हा मध्यमवर्गावरही होईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले.- राहुल गांधी यांनी ट्वीटरवर याच मुद्यावर सरकारला घेरले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त आपले पत्रकार आणि भांडवलदार मित्रांसाठी काम करीत आहेत. आज वस्तुस्थिती सगळ्यांच्या समाेर आहे.

- पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉटस‌्-ॲप चॅटिंगवरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही मोदी सरकारवर तिखट हल्ला केला. त्या म्हणाल्या, ‘देशाच्या सुरक्षेशी संबंधित अतिगोपनीय माहिती एका पत्रकाराला दिली गेली. आमच्या देशाचे वीर जवान शहीद झाले. पत्रकार म्हणतो की, ‘आमचा फायदा होईल.’ राष्ट्रवादाचा दावा करणारे राष्ट्रद्रोही कारवाया करताना पकडले गेले. ही खूप गंभीर बाब आहे. याची तटस्थ चौकशी झाली पाहिजे.” सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकत नाही, तर दुसरीकडे जवानांच्या जीविताशी खेळत आहे, असेही गांधी म्हणाल्या.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार