शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

काँग्रेस रस्ता भरकटलेला पक्ष : भूपेंद्र सिंह हुड्डा यांचा घरचा आहेर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 7:05 PM

येत्या काही दिवसात हरियाणातही पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता असून माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन केल्यावर अजूनही काँग्रेसची परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. एकीकडे संजय सिंग, भुवनेश्वर कलिता यांच्यासारख्या राज्यसभेच्या खासदारांनी राजीनामा दिलेला आहे तर दुसरीकडे कर्नाटक आणि गोव्यासारख्या राज्यातही पक्षाची स्थिती फारशी चांगली नाही. अशावेळी कलम ३७०च्या वेळीही पक्षातील मतभेद समोर आले होते. येत्या काही दिवसात हरियाणातही पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता असून माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर रविवारी रोहतक येथे शक्तिप्रदर्शन करत पक्षालाच खडे बोल सुनावले आहेत. यावेळी काँग्रेसचा रस्ता भरकटला आहे असे सुनावयालाही त्यांनी मागे-पुढे बघितले नाही.  ते म्हणाले की, 'काँग्रेस आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. कलम ३७० हटवण्यास माझा पाठिंबा होता मात्र पक्षातील काही नेते त्याच्या विरोधात होते. जेव्हा सरकार कोणताही योग्य निर्णय घेत असेल तर त्याचे समर्थन करणे गरजेचे आहे. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने ३७० कलम हटवण्यास विरोध केला त्यावरून पक्ष रस्ता भरकटल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीत कधीही स्वाभिमान आणि देशभक्तीची वेळ येते तेव्हा मी कधीही मागे-पुढे बघणार नाही'. पुढे ते म्हणाले की, मी हरियाणा सरकारला प्रश्न विचारू इच्छितो की त्यांनी मागील पाच वर्षात काय केले. त्यांना आता एकट्या ३७० कलमाच्या मुडद्यामागे लपून निवडणूक लढवता येणार नाही. हरियाणामधील अनेक तरुण काश्मीरमध्ये शिपाई म्हणून कर्तव्य बजावत असल्यामुळे या निर्णयाला समर्थन दिले होते. काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार ? हुड्डा यांनी बोलताना ज्या पद्धतीने स्वतःच्या पक्षाला आणि सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे ते बघता आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ते स्वतःचा वेगळा पक्ष काढण्याची शक्यता आहे. या रॅलीमध्ये त्यांनी त्यांच्या गटाच्या व्यतिरिक्त कोणत्याही काँग्रेस नेत्याला आमंत्रित केले नव्हते. त्यातच त्यांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक मानले जाणाऱ्या अशोक तंवर यांच्याचकडे राहुल गांधी यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे कायम ठेवल्यामुळे हुड्डा यांच्या नाराजीचा भर पडली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसHaryanaहरयाणाPoliticsराजकारण