Congress MP Rahul Gandhi Attack on Prime Minister Narendra Modi again | तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लुटा; पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्ला

तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लुटा; पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्ला

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : सरकारने प्रत्येक गरीब व्यक्तीच्या खात्यात सहा महिने साडेसात हजार रुपये टाकावेत म्हणजे देशाची अर्थव्यवस्था परत रुळांवर आणता येईल, अशी सूचना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा केली आहे.

गांधी यांचे मोदी यांच्यावर सतत हल्ले सुरू आहेत. मंगळवारी मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर गांधी यांनी पुन्हा हल्ला केला. ते म्हणाले, ‘‘तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लुटा, मुझे रहजनों से गिला तो है, पर तेरी रहबरी का सवाल है.’’
राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्तरावर सरकारविरोधात आघाडी सांभाळली तर पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारवर हल्ले करीत होत्या.

प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारने रोजगार देण्याच्या दिलेल्या आश्वासनांवर हल्ला करताना म्हटले की, ‘‘आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये जवळपास दीड लाख लोक आता मुंबईत परतले आहेत. राज्य सरकारने एका आयोजनाच्या माध्यमातून राज्यात असलेल्या भयंकर बेरोजगारीला झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु वस्तुस्थिती समोर आलीच. वस्तुस्थिती जाहिरातींच्या माध्यमांतून किती झाकून ठेवणार?’’ असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी विचारला.

चीनच्या सैन्याला कसे हटविणार?

  • राहुल गांधी मोदी यांचे नाव घेऊन म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांत कोरोनाने हिंदुस्तानची अर्थव्यवस्था नष्ट केली. आम्ही सरकारला तीन-चार वेळा सूचना केल्या होत्या.
  • ‘न्याय’ योजनेसारखी एक योजना लागू करावी, कायमस्वरूपी जरी नसली तरी सहा महिन्यांसाठी राबवावी, प्रत्येक गरीब कुटुंबाच्या बँक खात्यात दरमहा साडेसात हजार रुपये टाकावेत. यामुळे मागणी निर्माण होईल व पुन्हा अर्थव्यवस्था सुरू होईल. सरकारने हे मान्य केले नाही.
  • एकदा नव्हे तर ३-४ वेळेस सरकारने नाही म्हटले. कारण सांगितले की, आमच्याकडे पैसे नाहीत. सरकारने सगळ्यात श्रीमंत १५ जणांचा कर माफ केला होता आणि गेल्या तीन महिन्यांत सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवले आहेत. २२ वेळा सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवून तीन लाख कोटी रुपये सरकारकडे आले आहेत. त्यामुळे आमच्याकडे पैसा नाही असे म्हणणे योग्य नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
  • राहुल गांधी यांनी चीनवरून सरकारला नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन थेट प्रश्न विचारला की, ‘‘चीनने हिंदुस्तानची पवित्र जमीन हिसकावली आहे. आम्हाला सगळे माहीत आहे की, चीन लडाखमध्ये चार जागी आत येऊन बसला आहे. मोदी जी, तुम्ही देशाला सांगावे की, चीनचे सैन्य तुम्ही हिंदुस्तानमधून केव्हा आणि कसे काढणार?’’

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Congress MP Rahul Gandhi Attack on Prime Minister Narendra Modi again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.