शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

करिना कपूर भोपाळमधून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा लढवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 9:10 AM

करिनाच्या नावासाठी भोपाळमधील काँग्रेस नेते आग्रही

नवी दिल्ली: मध्य प्रदेशात महिन्याभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनंभाजपाचा पराभव केला. आता याच यशाची पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत करण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून अभिनेत्री करिना कपूरला लोकसभेची उमेदवारी देण्याचा आग्रह काँग्रेसच्या नगरसेवकांनी धरला आहे. करिना तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असल्यानं भोपाळ मतदारसंघ जिंकणं सोपं होईल, असं राजकीय गणित काँग्रेस नगरसेवकांनी मांडलं आहे. भोपाळ लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाकडे आहे. भाजपाच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसची डाळ शिजत नाही. त्यामुळे भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडायचं असल्यास करिना कपूर यांना उमेदवारी द्या, असा आग्रह काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाकडे धरला आहे. तरुणांमध्ये करिनाची लोकप्रियता खूप मोठी आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड आहे. याचा मोठा फायदा करिना कपूर आणि पर्यायानं काँग्रेसला होईल, असा दावा काँग्रेस नगरसेवक गुड्डू चौहान आणि अनीस खान यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं दिलं आहे.करिना कपूर पतौडी घराण्याची सून असल्यानं त्याचा फायदा तिला जुन्या भोपाळमध्ये होईल. याशिवाय महिला वर्गदेखील मोठ्या प्रमाणात करिनाला मतदान करेल, असा विश्वास नगरसेवक अनीस खान यांनी व्यक्त केला. करिनाचा पती सैफ अली खान आणि भोपाळ यांचा घनिष्ठ संबंध आहे. पतौडी कुटुंब अनेक वर्षांपासून भोपाळमध्ये वास्तव्यास आहे. सैफ, करिना, शर्मिला टागोर, सोहा अली खान अनेकदा भोपाळला येतात. भोपाळ आणि पतौडी घराण्यातील याच कनेक्शनचा फायदा करिनाला होईल, असा विश्वास काँग्रेसमधील अनेक नेत्यांना वाटतो. लवकरच यासाठी काँग्रेसचे नगरसेवक मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार आहेत.  

टॅग्स :Kareena Kapoorकरिना कपूरcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा