शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 17:08 IST

Rajendra Bharti Disqualified: काँग्रेसचे नेते राजेंद्र भारती यांना न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. २७ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात भारती यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

२७ वर्षांपूर्वींच्या बँक व्यवहार प्रकरणात दिल्लीतील एमपी-एमएलए न्यायालयाने दोषी ठरवत काँग्रेसचेमध्य प्रदेशातील आमदार राजेंद्र भारती यांना दोषी ठरवले. भारती यांना न्यायालयाने गुरुवारी (३ एप्रिल) तीन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर मध्य प्रदेश विधानसभा सचिवालयाने त्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची अधिसूचना काढली. हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगालाही कळवण्यात आला आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, दतिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या राजेंद्र भारती यांचे विधानसभा सदस्यत्व गुरुवारी मध्यरात्री रद्द करण्यात आले. 

राजेंद्र भारती बँक मुदत ठेव प्रकरण काय? 

भारती यांना शिक्षा झालेले प्रकरण १९९८ मधील आहे. श्याम सुंदर संस्थेचे अध्यक्ष आणि राजेंद्र भारती यांची आई सावित्री श्याम यांनी दतिया सहकारी ग्रामीण विकास बँकमध्ये १० लाख रुपये मुदत ठेवीत जमा केले होते. 

१९९८ ते २००१  या काळात राजेंद्र भारती हेच त्या बँकेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर ते श्याम सुंदर संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्यही होते. भारती यांनी लिपिक रघुवीर प्रजापती यांच्या सोबत मिळून बँकेच्या नोंदींमध्ये फेरफार केली आणि मुदत ठेवीचा कालावधी तीन वर्षांऐवजी १५ वर्षे असा केला. त्यानंतर वर्षाला १३.५ टक्के व्याजदरानुसार १,३५,००० इतके रुपये १९९९ ते २०११ या काळात काढण्यात आले होते. 

शिक्षा ठोठावताच मध्यरात्री आदेश

दिल्लीतील एमपी-एमएलए न्यायालयाने राजेंद्र भारती यांना दोषी ठरवले आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. रात्री १२.४३ वाजता त्यांच्या शिक्षेचा निकाल सार्वजनिक झाला. न्यायालयाने त्यांना ६० कालावधी देत शिक्षा निलंबित ठेवली आहे. या प्रकरणात सहआरोपी असलेल्या रघुवीर प्रजापती यालाही दोषी ठरवण्यात आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Leader Loses MLA Status Over 27-Year-Old Bank Case

Web Summary : Rajendra Bharti, Congress MLA, disqualified after a 1998 bank fraud conviction. He received a three-year sentence for manipulating fixed deposit records while chairman of a cooperative bank, leading to his immediate removal from the Madhya Pradesh legislative assembly. The Election Commission has been notified.
टॅग्स :MLAआमदारcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग