शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

‘राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण करण्यात आली!' राहुल गांधींनी सरकारवर केले 'हे' गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 1:55 PM

यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांसोबत धक्का-बुक्की करण्यात आली. सभापतीची जबाबदारी सभागृह चालवण्याची असते. विरोधकांची बाजू सभागृहात का ठेवू शकत नाही? (Rahul gandhi attacks modi government)

नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर विरोधी पक्षांनी गुरुवारी संयुक्त मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात डझनहून अधिक राजकीय पक्ष सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले, तसेच सभागृहात खासदारांसोबत गैरवर्तन झाल्याचेही ते म्हणाले. (Congress Leader Rahul gandhi attacks modi government parliament opposition march rajya sabha)

यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांसोबत धक्का-बुक्की करण्यात आली. सभापतीची जबाबदारी सभागृह चालवण्याची असते. विरोधकांची बाजू सभागृहात का ठेवू शकत नाही? 

राहुल गांधी म्हणाले, देशाचे पंतप्रधान आज देश विकण्याचे काम करत आहेत. देशाचा आत्मा दोन-तीन उद्योगपतींना विकला जात आहे. विरोधक संसदेत काहीही बोलू शकत नाहीत. देशातील 60 टक्के लोकांचा आवाज दाबला जात आहे, राज्यसभेत खासदारांशी गैरवर्तन करण्यात आले. आम्ही सरकारसोबत पेगासस मुद्द्यावर चर्चा करण्यासंदर्भात बोललो, आम्ही शेतकरी आणि महागाईचा मुद्दा उचलला. तसेच, ही लोकशाहीची हत्या आहे. असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल याचिकेवर २७ सप्टेंबरला सुनावणी; 'ते' अकाउंट बंद केल्याचे ट्विटरने सांगितले 

जंतर-मंतरवर राहुल गांधी -काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतील जंतर -मंतरवरही भाषण केले. यावेळी, आज देशात संविधानावर हल्ला होत आहे. नोटाबंदी-जीएसटी लागू करून नरेंद्र मोदी यांनी लघु उद्योग नष्ट केले, ते शेतकऱ्यांवर अत्याचार करतात, देशाच्या संसदेत प्रथमच खासदारांना मारहाण करण्यात आली, असे आरोपही राहुल गांधी यांनी केले.

विरोधी पक्षांची पत्रकार परिषद -विरोधी पक्षांच्या पक्षकार परिषदेत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, राज्यसभेत काल मार्शल लॉ लावण्यात आला, असे वाटत होते, की आम्ही पाकिस्तानच्या सीमेवर उभे आहोत. सरकार रोजच्या रोज लोकशाहीची हत्या करत आहे. आम्ही या सरकारविरोधात लढत राहू. याशिवाय राजदचे मनोज झा, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि इतर विरोधी नेत्यांनीही सरकारवर हल्ला चढवत गंभीर आरोप केले.

वाद पेटला! राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटनंतर आता काँग्रेसचंही अकाऊंट लॉक

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाSanjay Rautसंजय राऊत