शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

काँग्रेसमध्ये घमासान सुरूच! कपिल सिब्बल यांच्या नव्या ट्विटमुळे पुन्हा वादाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 2:18 PM

कपिल सिब्बल यांनी याआधी 'माझ्यासाठी पद नाही तर देश महत्त्वाचा' असे ट्विट केले होते.

ठळक मुद्देकाँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.

नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये अद्यापही घमासान सुरु असल्याचे दिसून येते. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचे नवीन ट्विट पुन्हा एकदा वाद निर्माण करू शकते. ज्यावेळी तत्त्वांसाठी लढा चालू असतो, त्यावेळी विरोध नेहमी ऐच्छिक असतो आणि समर्थन नेहमी व्यवस्थापित करण्यात येते, असे कपिल सिब्बल यांनी बुधवारी म्हटले आहे.

कपिल सिब्बल यांनी पुन्हा ट्विट केले आहे. "ज्यावेळी तत्त्वांसाठी लढा दिला जात आहे, तर आयुष्यात, राजकारणात, न्यायामध्ये, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये, सोशल मीडिया मंचांवर ऐच्छिक असतात. मात्र, समर्थन बरेचदा व्यवस्थापित केले केले जाते," असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी सुद्धा कपिल सिब्बल यांनी ट्विट केले होते. त्यावेळी 'माझ्यासाठी पद नाही तर देश महत्त्वाचा' असे ट्विट केले होते. त्यामुळे कपिल सिब्बल काँग्रेसशी बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले होते.

यापूर्वी कपिल सिब्बल यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून संघटनेत सर्वसमावेशक बदल करण्याची आणि पूर्णवेळ अध्यक्षांची मागणी केली होती. तसेच, पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह २० हून अधिक सदस्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष निवडीबाबत पत्र लिहिले होते. त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला होता. मात्र, काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.

संजय झा यांचा काँग्रेसवर निशाणा काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या संजय झा यांनीदेखील भाष्य केलं आहे. ही अंताची सुरुवात आहे, अशा शब्दांत झा यांनी काँग्रेसमधील घडामोडींवर निशाणा साधला आहे. झा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये काँग्रेसचा कुठेही उल्लेख नाही. मात्र त्यांचं ट्विट काँग्रेसमधील कुरबुरींवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या १०० हून अधिक नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिल्याचं संजय झा यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. मात्र त्यांचा दावा काँग्रेसनं खोडून काढला होता.

सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय? देशभरातील काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं २३ नेत्यांनी पत्रात म्हटलं होतं.

आणखी बातम्या...पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र     धक्कादायक! Rail Yatri वेबसाइटवरून ७ लाख प्रवाशांचा डेटा लीक, डेबिट कार्ड-UPI चे होते डिटेल्स    आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार    CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...    

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेस