शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोव्हॅक्सिन लसीमध्ये वासराच्या रक्तद्रावाचा काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 06:12 IST

केंद्र सरकारने आरोप फेटाळले . गौरव पांधी यांनी माहिती अधिकाराखालील प्रश्नाला केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) जे उत्तर दिले त्याची प्रतही टि्वटरवर झळकवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारत बायोटेक या कंपनीने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेच्या सहकार्याने बनविलेल्या कोवॅक्सिन लसीमध्ये गायीच्या वासराचा रक्तद्राव आहे, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते गौरव पांधी यांनी केला आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत त्यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला केंद्राकडून जे उत्तर मिळाले त्याचा आधार घेऊन पांधी यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या आरोपांचा केंद्र सरकारने ठाम शब्दांत इन्कार केला आहे.

गौरव पांधी यांनी माहिती अधिकाराखालील प्रश्नाला केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) जे उत्तर दिले त्याची प्रतही टि्वटरवर झळकवली आहे. पांधी यांनी दावा केला की, कोव्हॅक्सिन लसीमध्ये नवजात वासराचा रक्तद्राव आहे हे मोदी सरकारने मान्य केले. वीस दिवसांहून कमी वयाच्या वासरांची कत्तल करून त्यांचा रक्तद्राव लस बनविण्यासाठी वापरला आहे. हे अत्यंत भीषण कृत्य आहे. सीडीएससीओने म्हटले, व्हिरो पेशींच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेसाठी हा रक्तद्राव वापरला जातो. कोव्हॅक्सिन बनवितानाच्या प्रयोगांत कोरोना विषाणू निर्मितीत रक्तद्राव वापरण्यात आला, अशी माहिती भारत बायोटेकने आम्हाला दिली आहे. 

ही जगन्मान्य पद्धतीकेंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे की, व्हिरो पेशींचे पुनरुज्जीवन करण्यासाठीच नवजात वासराच्या रक्तद्रावाचा वापर करण्यात येतो. विविध प्राण्यांचे रक्तद्राव या प्रक्रियेसाठी वापरले जातात. ही जगन्मान्य पद्धती आहे. संभ्रमाला धार्मिक रंग? शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पांधी यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करा, असे सांगणारे लोकच आता माहिती अधिकारातील प्रश्नाला मिळालेल्या एका उत्तरावर विसंबून निरर्थक आरोप करीत आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस