“एका दगडात दोन पक्षी, PM मोदींसह RSS प्रमुख मोहन भागवतांनी निवृत्त व्हावे”; काँग्रेसचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 15:20 IST2025-07-11T15:17:25+5:302025-07-11T15:20:12+5:30
Congress News: बिचाऱ्या अवार्ड-जीवी पंतप्रधानांचे कशा पद्धतीने मायदेशात स्वागत केले जात आहे, असे म्हणत काँग्रेस नेत्यांनी टीका केली.

“एका दगडात दोन पक्षी, PM मोदींसह RSS प्रमुख मोहन भागवतांनी निवृत्त व्हावे”; काँग्रेसचा टोला
Congress News: राज्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येत असून, दुसरीकडे बिहार निवडणुका आणि अन्य मुद्द्यांवरून राष्ट्रीय पातळीवरील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांनी ७५ व्या वर्षी निवृत्त होण्यावरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष भाजपावर टीका करत आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधत आहेत. एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी सांगितलेल्या एका आठवणीचा संबंध पंतप्रधान मोदी यांच्या निवृत्तीशी जोडला जात आहे. परंतु, यातच आता पंतप्रधान मोदी यांच्यासह मोहन भागवत यांनीही निवृत्त व्हावे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.
मोरोपंत पिंगळे एकदा म्हणाले होते की, जेव्हा पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावे, तुमचे वय झाले आहे; बाजूला सरा, आम्हाला काम करू द्या, असा किस्सा मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितला. परंतु, यावरून मोहन भागवत यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी आता ७५ वर्षांचे होत आहेत. त्यामुळे संघानेच आता मोदींना बाजूला होण्याबाबत संकेत दिले आहेत, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट करत भाजपा, आरएसएसला टोला लगावला आहे.
पंतप्रधान मोदींसह संघाचे प्रमुख मोहन भागवतांनी निवृत्त व्हावे
बिचारे अवार्ड-जीवी पंतप्रधान. बघा, कशा पद्धतीने त्यांचे स्वागत केले जात आहे. ते परत येताच सरसंघचालकांनी त्यांना आठवण करून दिली की ते १७ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ वर्षांचे होतील. पण, पंतप्रधान सरसंघचालकांना हे देखील सांगू शकतात की, ते देखील ११ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ वर्षांचे होतील! एका दगडात दोन पक्षी, असे जयराम रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, अमित शाह यांच्या मनात निवृत्तीचे विचार येत असतील तर देशासाठी हे शुभसंकेत आहेत. ७५ वर्षे हे भाजपातील निवृत्तीचे वय आहे. नरेंद्र मोदींनी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग यांना निवृत्ती स्वतःच्या स्वार्थासाठी लादली. आता सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होत आहेत. जगभ्रमण करून झाले आहे. सगळी सुखे भोगून झाली आहेत. आता जो नियम तुम्हीच केला आहे ७५ वर्षे वयाचा. मला वाटते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना सूचित करत आहे की, तुम्हाला निवृत्त व्हावे लागेल. त्यांना देश सुरक्षित हातांमध्ये सोपवावा लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
बेचारे अवार्ड-जीवी प्रधानमंत्री! कैसी घर वापसी है ये- लौटते ही सरसंघचालक के द्वारा याद दिला दिया गया कि 17 सितंबर 2025 को वे 75 साल के हो जाएंगे।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) July 11, 2025
लेकिन प्रधानमंत्री सरसंघचालक से भी कह सकते हैं कि -वे भी तो 11 सितंबर 2025 को 75 के हो जाएंगे!
एक तीर, दो निशाने!