काँग्रेसचा राम मंदिराला विरोध नाही; माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह अयोध्येत दाखल, म्हणाले,...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:55 IST2026-03-26T12:34:58+5:302026-03-26T12:55:18+5:30

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह गुरुवारी अयोध्येत दाखल झाले. ते म्हणाले, "प्रभू राम आमचे आदर्श आहेत आणि आमची त्यांच्यावर श्रद्धा आहे. भाजप राम मंदिराच्या नावाखाली खोट्या गोष्टी रचते आणि फसवणूक करते. काँग्रेस कधीही राम मंदिराच्या विरोधात नव्हती.

Congress has no opposition to Ram temple; Former Chief Minister Digvijay Singh arrives in Ayodhya, says... | काँग्रेसचा राम मंदिराला विरोध नाही; माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह अयोध्येत दाखल, म्हणाले,...

काँग्रेसचा राम मंदिराला विरोध नाही; माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह अयोध्येत दाखल, म्हणाले,...

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह गुरुवारी अयोध्येत दाखल झाले. यावेळी त्यांनी आमचे आदर्श प्रभू राम आहेत आणि आमची त्यांच्यावर श्रद्धा आहे, असे त्यांनी सांगितले. "भाजप राम मंदिराच्या नावाखाली खोट्या कथा रचते आणि फसवणूक करते, असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस पक्ष कधीही राम मंदिराच्या विरोधात नव्हता, असेही सिंह म्हणाले.

'ते आधी बोललेच कसे?'; पवारांच्या उमेदवारीवरून ठाकरेंसमोरच चतुर्वेदी भडकल्या?; राऊत म्हणाले, "मी जन्मापासून..."

राम मंदिराला भेट देण्यासाठी अयोध्या विमानतळावर आगमन झाल्यावर पत्रकारांसोबत बोलताना माजी मुख्यमंत्री म्हणाले की, भगवान श्रीरामाची पूजा केल्यानंतर ते सोनिया गांधींच्या आरोग्यासाठी आणि काँग्रेस पक्ष मजबूत होण्यासाठी प्रार्थना करतील. देशात गॅस सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलचा तुटवडा आहे. ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेने सतर्क राहावे आणि खोटे बोलणाऱ्यांपासून सावध राहावे, असा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मतांसाठी राजकारण करतात आणि ते जनतेचे कधीही भले करू शकत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

माजी मुख्यमंत्र्यांनी विमानतळाबाहेर त्यांच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या काँग्रेस सदस्यांकडून पुष्पगुच्छ स्वीकारले, परंतु हार घालण्यास नकार दिला. काँग्रेस मजबूत झाल्यासच आपण हार घालू, असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री राम मंदिराला भेट देण्यासाठी कारने विमानतळावरून निघाले. हनुमंगढी आणि कनक भवनला भेट दिल्यानंतर, ते काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. निर्मल खत्री यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या बजाजा निवासस्थानी पोहोचले.

राम मंदिराच्या बांधकामासाठी १,११,१११ दान

दिग्विजय सिंह यांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी १,११,१११ रुपये दान केले. ते स्वतःला प्रभू रामाचे भक्त मानतात आणि त्यांनी नेहमीच श्रद्धा आणि राजकारण वेगळे ठेवल्याचे म्हटले आहे.

अजय राय आणि प्रमोद तिवारी यांनीही राम मंदिराला दिली भेट 

गेल्या सोमवारी, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय आणि राज्य प्रभारी अविनाश पांडे यांच्यासह अनेक काँग्रेस नेते राम मंदिराला भेट दिली. काँग्रेस नेते शंभरहून अधिक वाहनांच्या ताफ्यासह आले होते.

Web Title : कांग्रेस राम मंदिर के खिलाफ नहीं: दिग्विजय सिंह अयोध्या पहुंचे

Web Summary : दिग्विजय सिंह अयोध्या पहुंचे और भगवान राम में अपनी आस्था व्यक्त की। उन्होंने भाजपा पर राम मंदिर का राजनीतिक लाभ उठाने का आरोप लगाया और स्पष्ट किया कि कांग्रेस ने कभी इसका विरोध नहीं किया। उन्होंने मंदिर निर्माण के लिए ₹1,11,111 का दान दिया। हाल ही में अन्य कांग्रेस नेताओं ने भी मंदिर का दौरा किया।

Web Title : Congress Not Against Ram Temple: Digvijaya Singh Visits Ayodhya

Web Summary : Digvijaya Singh visited Ayodhya, affirming his faith in Lord Ram. He accused BJP of exploiting the Ram Temple for political gain and clarified Congress never opposed it. He donated ₹1,11,111 for the temple's construction. Other Congress leaders also visited the temple recently.