शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

खोटे खपविण्यासाठी काँग्रेसने निर्लज्जपणाचा कळस गाठला - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 6:56 PM

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, राफेल विमान खरेदी आणि अन्य मुद्द्यांवरून काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. यावरून मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस खोटे खपविण्यासाठी बेशरम झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.भाजपच्या एका कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कार्यक्रमात मोदी ...

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, राफेल विमान खरेदी आणि अन्य मुद्द्यांवरून काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. यावरून मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस खोटे खपविण्यासाठी बेशरम झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपच्या एका कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कार्यक्रमात मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले की, भाजप सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी काम केले आहे. इंदन वाढले तरीही भाजपने रोजच्या जिवनावश्यक वस्तूंचे दर वाढवले नाहीत. महागाईला नियंत्रमात ठेवले आहे. काँग्रेस सरकार 10 टक्क्यांवर होती, आमच्या सरकारच्या काळात महागाईदर 3-4 टक्क्यांवर आला आहे. 

यावेळी मोदी यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ज्या लोकांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना यापूर्वी 18 हजार रुपये कर भरावा लागत होता. आता 5 हजार रुपये भरावा लागत आहे. तसेच भविष्यात आयकर भरण्याचा स्लॅब 10 वरून 5 टक्के करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. वरिष्ठ नागरिकांसाठी टॅक्सही कमी करण्यात आल्याचे ते म्हणाले. 

मध्यम वर्गाला आपले घर खरेदी करणे कठीण बनत होते. आता ते स्वप्न पुर्ण करणे सोपे झाले आहे. गृह कर्जासाठी पुर्वी 10 टक्के व्याज द्यावे लागत होते, आता ते 8.75 टक्क्यांवर आले आहे. यामुळे लोक वर्षाला 35-40 हजार रुपये वाचवत आहेत. तसेच इतरही कर्जे स्वस्त झाली आहेत. महत्वाचा म्हणजे मोबाईल डेटास्वस्त झाला आहे, असेही मोदी यांनी सांगितले. 

भाषणाच्या सुरुवातीला मोदी यांनी राहुल गांधी यांच्या सरदार वल्लभ भाई पटेलांच्या पुतळ्यावरील वक्यव्याचा समाचार घेतला. काँग्रेस पक्ष खोटे दावे खपविण्यासाठी निर्लज्जपणाचा आधार घेत आहे. काँग्रेसने पटेल यांची आजपर्यंत आठवणही काढली नाही, देश त्यांचा सन्मान करत आहे, तर काँग्रेसला ते चालत नाहीय, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाInflationमहागाई