हिमंता यांच्या गोळ्या झाडतानाच्या व्हिडिओवरून काँग्रेस भडकली; आसाम भाजपनं शेअर केलेला AI व्हिडिओ वाद वाढल्यानंतर केला डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 01:24 IST2026-02-09T01:23:24+5:302026-02-09T01:24:10+5:30

यावर्षात आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशा परिस्थितीत हा व्हिडिओ समोर आल्याने वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत.

Congress gets angry over Himanta's shooting video, Assam BJP shared AI video; Deleted after controversy escalated | हिमंता यांच्या गोळ्या झाडतानाच्या व्हिडिओवरून काँग्रेस भडकली; आसाम भाजपनं शेअर केलेला AI व्हिडिओ वाद वाढल्यानंतर केला डिलीट

हिमंता यांच्या गोळ्या झाडतानाच्या व्हिडिओवरून काँग्रेस भडकली; आसाम भाजपनं शेअर केलेला AI व्हिडिओ वाद वाढल्यानंतर केला डिलीट

आसाम भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. या व्हिडिओनंतर, देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. वाद वाढल्यानंतर हा व्हिडिओ हटवण्यातही आला, मात्र, या व्हिडिओवरून आसाममधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर्षात आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशा परिस्थितीत हा व्हिडिओ समोर आल्याने वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत.

व्हिडिओमध्ये काय? 
शनिवारी भाजपने 'पॉइंट ब्लँक शॉट' या कॅप्शनसह हा व्हिडिओ अपलोड केला होता. यात मुख्यमंत्री हिमंता टोपी घातलेल्या दोन व्यक्तींच्या चित्रांवर गोळ्या झाडताना दाखवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा 'काऊबॉय'च्या पेहरावात दिसत असून, व्हिडिओच्या शेवटी "बांगलादेशींवर दया नाही", "तुम्ही पाकिस्तानला का गेला नाही?" आणि "परकीयमुक्त आसाम", असे लिहिण्यात आले आहे.

"हे भाजपचे 'फॅसिस्ट' रूप" -
काँग्रेसने या व्हिडिओचा निषेध केल आहे. तसेच, हे भाजपचे 'फॅसिस्ट' रूप असल्याचे म्हटले आहे. "हा केवळ ट्रोल कंटेंट नसून द्वेष पसरवणारा आणि अत्यंत विचलित करणारा प्रकार आहे." अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली. काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडिओ शेअर करत थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. तसेच, "न्यायव्यवस्था व इतर संस्था झोपल्या आहेत का?" असा प्रश्नही केला आहे.

तृणमूल काँग्रेसने (TMC) या व्हिडिओला "नरसंहार आणि सामूहिक हत्येला दाखवलेली हिरवी झेंडी," म्हटले आहे. भाजपने भारताच्या राजकीय चर्चेची पातळी खालावली असून संविधानाच्या धर्मनिरपेक्ष भावनेला पायदळी तुडवले आहे, असा आरोप टीएमसीने केला. तर, सीपीएमने याला नरसंहारासाठीचे खुले आव्हान, असल्याचे म्हटले आहे.
 

Web Title : हिमंता के शूटिंग वीडियो पर कांग्रेस भड़की; असम भाजपा ने AI वीडियो हटाया।

Web Summary : असम भाजपा द्वारा हिमंता की शूटिंग का विवादास्पद AI वीडियो साझा करने पर कांग्रेस, टीएमसी और सीपीएम ने इसे फासीवादी, नरसंहारकारी और धर्मनिरपेक्षता के लिए खतरा बताया, जिसके कारण असम चुनावों से पहले बढ़ते राजनीतिक तनाव के बीच इसे हटा दिया गया।

Web Title : Congress enraged over Himanta's shooting video; Assam BJP deletes AI video.

Web Summary : Assam BJP shared a controversial AI video showing CM Himanta shooting at targets. Congress, TMC, and CPM condemned it as fascist, genocidal, and a threat to secularism, leading to its deletion amidst rising political tensions ahead of Assam elections.