शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

“अमेरिकेत फोटोशूट करता आले नाही म्हणून PM मोदींनी सेंट्रल व्हिस्टाला भेट दिली”; काँग्रेसचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 10:52 AM

पंतप्रधान मोदी कोणतीही पूर्वसूचना न देताच रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचल्याचे सांगितले जाते.

नवी दिल्ली: अलीकडेच पंतप्रधाननरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरून मायदेशात परतले. अनेकार्थाने पंतप्रधान मोदी यांचा अमेरिका दौरा विशेष आणि महत्त्वाचा होता. मात्र, यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पामधील संसद भवनाच्या कामाला अचानक भेट दिली. पंतप्रधान मोदी कोणतीही पूर्वसूचना न देताच रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचल्याचे सांगितले जाते. या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर काँग्रेसने पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. अमेरिकेत फोटोशूट करता आले नाही, म्हणून पंतप्रधान मोदींनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला भेट दिली, असा चिमटा काढण्यात आला आहे. (congress criticised pm modi over sudden visit to central vista project in delhi)

मोदी सरकार आता जमिनी, मालमत्ता विकून कोट्यवधीचा निधी उभारणार; विशेष कंपनी स्थापन करणार!

काँग्रेसचे नेते श्रीनिवास बी. व्ही यांनी पंतप्रधान मोदींवर खोचक निशाणा साधला. अमेरिकेत मोदींचे स्वागत झाले नाही, म्हणून दिल्लीतच स्वागत करुन घेतले. व्हाईट हाऊसमध्ये फोटोशूट झाले नाही म्हणून सेंट्रल व्हिस्टावरच काम चालवून घेतले. साहेबांचे जगच वेगळे आहे, असा टोला ट्विट करत लगावण्यात आला. 

“BJP वाले खूपच हुशार, त्यांच्याकडूनच ‘भारत बंद’ची आयडिया मिळाली”; राकेश टिकैत यांचा टोला

लेपल माइक देखील राहून गेला

चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनीही पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत मोदी सेंट्रल व्हिस्टा बांधकाम परिसरात दिसत आहेत. या ट्विटमध्ये विनोद कापरी यांनी म्हटले आहे की, कोणतीही पूर्वसूचना न देता भेट दिल्याने मल्टि कॅमेरा शूट होऊ शकले नाही आणि लेपल माइक देखील राहून गेला. देशवासीयांनो सॉरी, असे खोचक ट्विट करण्यात आले आहे. 

दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी मात्र पंतप्रधान मोदींच्या सेंट्रल व्हिस्टाच्या भेटीचे कौतुक केले आहे. विकासाचा ध्यास हाच श्वास! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार हेच सिद्ध केले आहे. अमेरिकेहून परतल्यावर त्यांनी सेंट्रल व्हिस्टाची पाहणी करण्यासाठी जाणे अचंबित करणारे आहे. त्यांची ही ऊर्जा आम्हा सगळ्यांना नेहमी प्रेरणा देते, म्हणूनच मोदीजी आमचे मार्गदर्शक व आदर्श आहेत, असे भाजपचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी