Farmers Protest: “BJP वाले खूपच हुशार, त्यांच्याकडूनच ‘भारत बंद’ची आयडिया मिळाली”; राकेश टिकैत यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 07:43 AM2021-09-28T07:43:52+5:302021-09-28T07:45:40+5:30

Farmers Protest: ‘भारत बंद’ची संकल्पना भाजपवाल्यांकडूनच मिळाल्याचा टोला राकेश टिकैत यांनी लगावला.

rakesh tikait criticized bjp and modi govt over farmers protest bharat badh | Farmers Protest: “BJP वाले खूपच हुशार, त्यांच्याकडूनच ‘भारत बंद’ची आयडिया मिळाली”; राकेश टिकैत यांचा टोला

Farmers Protest: “BJP वाले खूपच हुशार, त्यांच्याकडूनच ‘भारत बंद’ची आयडिया मिळाली”; राकेश टिकैत यांचा टोला

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद यशस्वीदेशातील हजारो ठिकाणी शेतकरी रस्त्यावरकाश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत शेतकरी बंदला पाठिंबा

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या १० ते ११ महिन्यांपासून दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन कायम आहे. आंदोलक शेतकरी आणि केंद्रातील मोदी सरकार आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. यातच सोमवारी शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. याला देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. उत्तरेकडील काही राज्ये वगळता याचा फारसा परिणाम दिसला नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले असून, ‘भारत बंद’ची संकल्पना भाजपवाल्यांकडूनच मिळाल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला. (rakesh tikait criticized bjp and modi govt over farmers protest bharat badh)

“अमित शाह म्हणजे गजनी, उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व”; शिवसेनेची बोचरी टीका

काँग्रेस, शिवसेना यासह अन्य पक्षांनी शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा दर्शवला होता. उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ८०० ठिकाणी शांततेत आंदोलन पार पडले. काही ठिकाणी दुकाने खुली होती. मात्र, आंदोलनाची प्रभाव कमी झाला नाही. आंदोलन यशस्वी ठरले, अशी माहिती देत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कायदा रद्द न करण्याच्या अटीवर चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यात बदल करू असेही म्हटले आहे. सरकारने आधीच ठरवून ठेवले असेल, तर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. 

“आदित्य ठाकरेचा अभिमान, डेक्कन ओडिसी ट्रेनमध्ये कॅबिनेट बैठक घेणार”: CM उद्धव ठाकरे

BJP वाल्यांकडून ‘भारत बंद’ची आयडिया मिळाली

भाजपवाल्यांनी यापूर्वी ‘भारत बंद’ची हाक काहीवेळा दिली होती. ते खूपच हुशार, ज्ञानी आहेत. त्यांच्याकडूनच ‘भारत बंद’ची संकल्पना मिळाली, असा टोला लगावत आम्ही कुठेही सीलबंद आंदोलन केले नाही. सामान्य नागरिकांना, वाहनांना ये-जा करण्याची मुभा दिली होती. कोणाचीही अडवणूक केली नाही. ‘भारत बंद’ शांततेत आणि यशस्वीरित्या पार पडले, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. शेतकरी आंदोलन केवळ तीन राज्यांचे नसून, संपूर्ण देशाचे आहे, असे टिकैत यांनी म्हटले आहे. 

“अन्यथा गलवान, डोकलाममध्ये भारताला विजय मिळवता आला नसता, देशाची प्रतिष्ठा वाढली”

दरम्यान, शेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद यशस्वी झाला. आपला संताप व्यक्त करण्यासाठी देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले. देशातील हजारो ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शेतकऱ्यांबरोबरच कामगार, व्यापारी, कर्मचारी संघटनांचाही पाठिंबा मिळाला. देशातील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत शेतकरी बंदला पाठिंबा मिळाला, असा दावा राकेश टिकैत यांनी ‘भारत बंद’ संपल्यानंतर  केला.
 

Web Title: rakesh tikait criticized bjp and modi govt over farmers protest bharat badh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.