शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परदेश दौऱ्यांवरून काँग्रेस-भाजपत रण

By admin | Updated: September 25, 2015 00:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यांवरून भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि काँग्रेस पक्षात चांगलीच जुंपली आहे

शीलेश शर्मा, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यांवरून भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि काँग्रेस पक्षात चांगलीच जुंपली आहे.काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्याबाबत लपवाछपवी करीत असल्याचा भाजपाचा आरोप आहे तर काँग्रेसने मोदींच्या विदेश दौऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.भाजपा प्रवक्ते जी.व्ही.एल. नरसिम्हा राव यांनी राहुल यांच्या अमेरिका दौऱ्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आस्पेन इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाचा उल्लेख करीत राव म्हणाले की, ‘वीकएण्ड विथ चार्ली रोझ’ हा कार्यक्रम २५ जून ते ४ जुलैदरम्यान आयोजित केला गेला होता.विशेष म्हणजे राहुल गांधी या नावाच्या कुठल्याही व्यक्तीने या कार्यक्रमात भाग घेतला नव्हता व भविष्यातही अशी व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होण्याचे नियोजित नाही, असे खुद्द आस्पेनच्या व्यवस्थापकाने स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांच्या भारतातील अनुपस्थितीमागचे खरे कारण काँग्रेस दडवू पाहत असल्याचा आरोपही राव यांनी केला. मोदी जपानला गेले तेव्हा ३.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानंतर चीन भेटीत १० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे आश्वासन त्यांनी दिले होते. ही गुंतवणूक आली काय? मोदींच्या संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्याच्या वेळीही असेच घडले.शेकडो डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल, असे आश्वासन मोदींनी दिले होते. आता त्या सर्व गुंतवणुकींचे काय झाले, असा सवाल सुरजेवाला यांनी केला.राहुल हे ‘वीकएण्ड विथ चार्ली रोझ’ या परिषदेसाठी अमेरिकेला गेल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मात्र भाजपने काँग्रेसचा हा दावाच खोटा ठरवताना अमेरिकेतील ज्या कार्यक्रमासाठी राहुल गांधी गेल्याचे सांगण्यात येत आहे, तो जुलैतच पार पडला असल्याचा प्रतिदावा केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्याचा प्रारंभ केला असतानाच काँग्रेसने त्यांच्या विदेश दौऱ्यांवर जोरदार हल्ला चढवीत, १५ महिन्यांत २९ देशांचा दौरा करणारे ‘एनआरआय पंतप्रधान’ अशी त्यांची संभावना केली आहे.मोदींच्या या विदेश दौऱ्यांमधून भारताने काय साध्य केले, असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला.‘पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांवर जनतेचे किमान २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या विदेश दौऱ्यांपासून काय साध्य झाले’, असा सवाल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत उपस्थित केला.ते म्हणाले, ‘आपल्या अनिवासी भारतीय पंतप्रधानांचा हा २९ वा विदेश दौरा आहे. मोदी १५ महिन्यांपासून सत्तेवर आहेत आणि या १५ महिन्यांतील साडेतीन महिने परदेशात घालविले आहेत. आता आपले एनआरआय पंतप्रधान पुन्हा एकदा स्वप्रचार आणि सेल्फी काढण्यासाठी परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या वारंवार होणाऱ्या या विदेश दौऱ्यांमधून काय साध्य झाले आणि अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक येणार, या त्यांच्या आश्वासनाचे काय झाले?